अहमदनगर - साई बाबांचा दर्शानासाठी विमानाने शिर्डीला येणाऱ्या साई भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिर्डी विमानतळावर आता नाईट लँडिंग सुविधाही सुरु करण्यात आली आहे. यामुळे आता भाविकांना रात्री शिर्डीला विमानाने येणे शक्य होणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश तसेच विदेशातील विमानसेवा सध्या बंद करण्यात आल्या आहेत. या पुन्हा सुरू होताच शिर्डीच्या विमानतळावर रात्रीही विमाने उतरु शकतील, या दृष्टिने महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने तयारी केली असल्याची माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक दिपक शास्त्री यांनी 'ईटीव्ही भारत'ला बोलताना दिली.
साई भक्तांसाठी आनंदाची बातमी; शिर्डी विमानतळ आता नाईट लँडिंगसाठी झालयं सज्ज - शिर्डी विमानतळ विषयी न्यूज
शिर्डी विमानतळावर आता नाईट लँडिंग सुविधाही सुरु करण्यात आली आहे. यामुळे आता भाविकांना रात्री शिर्डीला विमानाने येणे शक्य होणार आहे.