ETV Bharat / state

Robbery Gang Arrested In Ahmednagar: मोठ्या दरोड्याचा कट पोलिसांनी उधळला; राजस्थान, हरियाणातील टोळी जेरबंद - दरोड्याचा कट उधळून लावण्यात पोलिसांना यश

मोठ्या दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला अहमदनगर पोलिसांनी पकडले आहे. अहमदनगरमधील शेंडी-मनमाड बायपास येथे 10 ऑगस्टला रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मोठ्या दरोड्याचा कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आले आहे. संशयित आरोपी हे राजस्थान आणि हरियाणा येथील रहिवासी आहेत.

Robbery Gang Arrested In Ahmednagar
मोठ्या दरोड्याचा कट पोलिसांनी उधळला
author img

By

Published : Aug 12, 2023, 8:51 PM IST

दरोडेखोरांच्या टोळीला अटक

अहमदनगर: अहमदनगर- शेंडी-मनमाड बायपास रोडवर अंधारात काही लोक राजस्थान व हरियाणा पासिंगच्या दोन ट्रकमधून येऊन गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत होते, अशी गुप्त माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. या आधारे कारवाई करण्याबाबत पोलिसांना सूचना मिळाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत टोळीला अटक केली आहे.

असा आहे घटनाक्रम: पोलीस पथक 10 ऑगस्टला रात्री आठच्या सुमारास शेंडी ते मनमाड बायपास रोडवर दाखल झाले होते. त्यावेळी हॉटेल किनाऱ्याच्या पुढे दोन ट्रक रस्त्याच्या कडेला लावून काही संशयित अंधारात दबा धरुन बसलेले पोलीस पथकास दिसले. पोलीस त्यांना ताब्यात घेण्याच्या तयारीत असताना दोन संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. मात्र, पोलीस पथकाने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. सुरूवातीला चौकशी दरम्यान संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

'ही' आहेत संशयितांची नावे: संशयितांमध्ये अरशद हसन खान, मोबीन जगमाल खान, अहमद उस्मान खान, खलील महंमद इसराईल खान, सुनिल रामअवतार कुमार, खुर्शिद मंगल खान, मोहमंद आरिफ जोरमल, हासिम बसरु खान, अलीम करीउद्दीन खान, ताजमहंमद रहेमान, रईस इसाक खान यांचा समावेश आहे. हे सर्व राजस्थान आणि हरियाणा येथील रहिवाशी आहेत. तर मोहमंद अफजल जोरमल, तय्यब मंगलखान असे फरार संशयितांची नावे आहेत.

35 लाखांचा मुद्देमाल जप्त: ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून एक तलवार, तीन सुरे, कटर, फायटर, स्क्रु ड्रायव्हर, लाकडी दांडके, गलोल, मिरचीपूड, तीन विविध कंपनीचे मोबाईल फोन तसेच टाटा व आयशर कंपनीचे दोन ट्रक असा एकूण 35 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विचारपूस केली असता आरोपींनी दरोड्यासारख्या गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने आल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादंवि 399, 402 सह आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहे.

पोलिसांचे कौतुक: ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. या कारवाईमुळे नागरिकांकडून स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक होत आहे.

हेही वाचा:

  1. Pune Crime : मार्केटयार्डमध्ये दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, खंडणी विरोधी पथकाची कामगिरी
  2. यवतमाळमध्ये घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद, 9 लाखांचा मुद्देमाल जप्त
  3. रात्री गाडीचा जॅक टाकून लुटणारी टोळी लोणंद पोलिसांकडून जेरबंद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.