अहमदनगर- जिल्ह्यात सकाळच्या सत्रात १० रुग्ण वाढल्यानंतर आणखी नव्याने १४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या एकूण चोवीस रुग्णात अठरा रुग्ण एकट्या नगर शहरातील असल्याने शहरवासीयांची चिंता वाढली आहे.
नगर शहरातील अठरा, संगमनेर पाच आणि श्रीरामपूर येथील दोन रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ६२ झाली असून एकूण रुग्ण संख्या ३२८ इतकी झाली आहे. तर २५४ जण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
हेही वाचा -रामदेव बाबांविरोधात गुन्हा दाखल करा; आयुष टास्क फोर्सची मागणी
-७० जणांचे अहवाल निगेटिव्ह
अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज दुपारी ७० व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.