ETV Bharat / state

Ahmednagar Crime News: धक्कादायक! पाथर्डी येथील एकाच विहिरीत आढळले चार मृतदेह; मृतांमध्ये आईसह तीन मुलांचा समावेश - विहरीत मृतदेह

अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील माळीबाभूळगावमध्ये एकाच विहरीत चार मृतदेह आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Ahmednagar Crime News
विहिरीत चार मृतदेह
author img

By

Published : Jun 23, 2023, 8:35 AM IST

विहरीत आढळले चौघांचे मृतदेह

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील माळीबाभुळगाव हद्दीतील दिपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्म शेजारील विहरीत चार मृतदेह आढळल्याने पाथर्डी तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पाथर्डी येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली. धम्मपाल सांगडे (वय-३० वर्षे) हा करोडी, ता.हादगाव, जि.नांदेड येथील मुळ रहीवाशी आहे. तो बायको कांचन व एक मुलगा, दोन मुली यांना घेवुन दिपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्मवर मजुरीने काम करीत होता.

चौघांचे मृतदेह विहरीत : या कुंटुबातील एक महीला, तिचा एक मुलगा व दोन मुली अशी तिन मुले यांचे चौघांचे मृतदेह विहरीत सापडले आहे. पोलिसांनी मयत महीलेचा पती ताब्यात घेतला आहे. चौंघाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. पाथर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. दिपक गोळक यांचा माळीबाभुळगाव हद्दीत फ्लाईंगबर्ड शाळेच्या पाठीमागे पोल्ट्रीफार्मचा उद्योग आहे. तेथे पाच कुटुंब व इतर पाचजण राहतात.

नवरा बायकोत वाद : धम्मपाल सांगडे व त्याची पत्नी कांचन सांगडे, मुलगा निखील सांगडे, मुलगी निषीधा व संचिता असे राहत होते. धम्मपाल सांगडे व त्याची पत्नी कांचन यांच्यात बुधवारी रात्री वाद झाला. यावेळी इतरांनी मध्यस्थी करुन वाद मिटविला. झोपल्यानंतर पुन्हा नवरा बायकोत वाद झाल्याचे समजले. त्यानंतर सकाळी पोल्टीफार्मवर काम करणारा एकजण विहरीवर मोटार सुरु करायला गेला होता. तेव्हा निषीधा धम्मपाल सांगडे (वय-दीडवर्षे) हीचा मृतदेह विहरीच्या पाण्यावर तरंगताना दिसला. पोल्ट्रीपार्मचे चालक दिपक गोळक यांना माहीती मिळताच त्यांनी पोलिसात खबर दिली. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, रामेश्वर कायंदे, सचिन लिमकर, सुरेश बाबर, कृष्णा बडे, राजेंद्र सुद्रुक असे पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी गेले. विहरीत तिस ते पस्तीस फुट पाणी होते.

हत्या की आत्महत्या : विजपंपाच्या सहाय्याने पाणी उपसले. तिन ते चार तास पाणी उपसल्यानंतर कांचन धम्मपाल सांगडे (वय २६ वर्षे), निखील धम्मपाल सांगडे( वय-६ वर्षे), संचिता धम्मपाल सांगडे (वय- ४ वर्षे) असे तिघांचे मृतदेह सापडले. कांचन व तिचे तिनही मुले विहरीत मृत अवस्थेत सापडले. पोलिसांनी कांचनचा नवरा धम्मपाल सांगडे याला ताब्यात घेतले आहे. हत्या की आत्महत्या ? नेमकी ही घटना कशामुळे घडली याचा कसून तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा :

  1. Darshana Pawar Murder : दर्शना पवार खून प्रकरण; प्रेमाला नकार दिला म्हणून राहुलने दर्शनाची केली हत्या
  2. kasara Ghat News: कसारा घाट बनले मृतदेहांना फेकण्याचे ठिकाण; पुन्हा दोन व्यक्तीची हत्या करून मृतदेह फेकले घाटात
  3. Mumbai Crime News: वसतिगृह हत्याकांड: विद्यार्थिनीने मृत्यूच्या तीन-चार दिवसांपूर्वी आईकडे सुरक्षारक्षकाची केली होती तक्रार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.