ETV Bharat / state

वाळू तस्करांची सव्वा कोटींची मशिनरी जप्त; अहमदनगर जिल्हा गुन्हे शाखेची कारवाई

पुणे जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या आर्वी गावात वाळू तस्करांमार्फत वाळू उपसा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. त्यावरून पोलिसांच्या दहा-अकरा कर्मचाऱ्यांच्या पथकाने गुप्तपणे शेतातून जाऊन एकाच वेळी भीमा नदी पात्रात छापा टाकला.

वाळू तस्करांची सव्वा कोटींची मशिनरी जप्त करण्यात आली आहे.
author img

By

Published : May 11, 2019, 10:09 PM IST

अहमदनगर- पुणे जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या आर्वी गावात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने आज दुपारी मोठी कारवाई करत वाळू तस्करांचे अनेक वाहने, मशिन्स जप्त केले. यावेळी भीमा नदीपात्रातून वाळू उपसा करणारे सात जेसीबी, सहा ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच दोन आरोपींना अटक करण्यात आली असली तरी इतर अनेकजण पसार झाले आहेत.

भीमा नदी पात्रातील आर्वी गावात वाळूचा खुलेआम उपसा होत आहे. प्रशासनाकडे याबाबत अनेक तक्रारी असून यापूर्वीही या परिसरात कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र, पोलीस-महसूलचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अवैध वाळू उपसा पुन्हा सुरू राहिला आहे. या परिसरात वाळू तस्करांमार्फत वाळू उपसा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. त्यावरून पोलिसांच्या दहा-अकरा कर्मचाऱ्यांच्या पथकाने गुप्तपणे शेतातून जाऊन एकाच वेळी भीमा नदी पात्रात छापा टाकला.

जिल्हा गुन्हे अन्वेषणची मोठी कारवाई करत वाळू तस्करांची सव्वा कोटींची मशिनरी जप्त केली आहे.

गुन्हे अन्वेषणची कारवाई कौतुकास्पद

वाळू तस्करांचे नेटवर्क स्ट्राँग असल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी संशय येऊ नये, यासाठी खासगी वाहनाने एक एकट्याने जाऊन एकाच वेळी छापा टाकला. पोलीस आल्याचे समजतात वाहने जागेवरच सोडून चालक व इतर कर्मचारी पळून गेले. दोन चालक पोलिसांच्या हाती लागले आहेत. तेथून सात जेसीबी व सहा ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. यात सुमारे सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

आज दुपारी सव्वादोन वाजण्याच्या ही कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमुळे भीमा नदीपात्रात वाळू तस्करी करणाऱयांचे धाबे दणाणले आहेत. कारवाईनंतर श्रीगोंदा पोलिसांना पाचारण करण्यात आले. सदर वाहने जप्त करून वाळूतस्करांविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांकडून घटनास्थळ पंचनामा करण्यात आला आहे.

Intro:अहमदनगर- जिल्हा गुन्हे अन्वेषणची मोठी कारवाई.. वाळू तस्करांची सव्वा कोटींची मशिनरी जप्त..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_11_may_ahm_trimukhe_1_police_sand_action_v

अहमदनगर- जिल्हा गुन्हे अन्वेषणची मोठी कारवाई.. वाळू तस्करांची सव्वा कोटींची मशिनरी जप्त..

अहमदनगर- पुणे जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या आर्वी गावात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने आज दुपारी मोठी कारवाई करत वाळू तस्करांचे अनेक वाहने, मशिन्स जप्त केले.. यावेळी भीमा नदीपात्रातून वाळू उपसा करणारे सात जेसीबी, सहा ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच दोन आरोपींना अटक करण्यात अटक आली असली तरी इतर अनेकजण पसार झाले आहेत.
भीमा नदी पात्रातील आर्वी गावात वाळूचा खुलेआम उपसा होत आहे. प्रशासनाला कडे याबाबत अनेक तक्रारी असून यापूर्वीही या परिसरात कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र पोलीस-महसूल चे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अवैध वाळू उपसा पुन्हा सुरू राहिला आहे. याबाबतत या परिसरात वाळू तस्करांच् मार्फत वाळू उपसा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. त्यावरून पोलीस पथकाने गुप्तपणे शेतातून जाऊन एकाच वेळी सुमारे दहा-अकरा कर्मचाऱ्यांच्या पथकाने भीमा नदी पात्रात छापा टाकला.

गुन्हे अन्वेषणची कारवाई कौतुकास्पद-
-वाळू तस्करांची नेटवर्क स्ट्रॉंग असल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी संशय येऊ नये, यासाठी खासगी वाहनाने एकएकट्याने जाऊन एकाच वेळी छापा टाकला. पोलीस आल्याचे समजतात वाहने जागेवरच सोडून चालक व इतर कर्मचारी पळून गेले. दोन चालक पोलिसांच्या हाती लागले आहेत. तेथून सात जेसीबी व सहा ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. यात सुमारे सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
आज दुपारी सव्वादोन वाजण्याच्या ही कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमुळे भीमा नदीपात्रात वाळूतस्करी करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. कारवाईनंतर श्रीगोंदा पोलिसांना पाचारण करण्यात आले. सदर वाहने जप्त करून वाळूतस्करांविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांकडून घटनास्थळ पंचनामा करण्यात आला आहे.

राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.
Conclusion:अहमदनगर- जिल्हा गुन्हे अन्वेषणची मोठी कारवाई.. वाळू तस्करांची सव्वा कोटींची मशिनरी जप्त..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.