अहमदनगर - जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय कोविड लॅबसह खासगी लॅबमधील कोरोना चाचणी अहवालात दिवसभरात ११७ कोरोनाबाधित नवे रुग्ण असल्याचे समोर आले आहे. पाथर्डी शहरात गेल्या दोन दिवसांत वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन आता पाथर्डी शहर पुढील दहा दिवसांसाठी पूर्ण लॉकडाऊन करण्यात आले असून पाथर्डीत कुणाही बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश बंदी करण्यात आली आहे. नगर, संगमनेर नंतर आता पाथर्डी शहर सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. नगर शहरातील जवळपास सात ठिकाणी कंटेन्मेंट झोन आहेत. यामुळे जवळपास निम्मे नगर शहर लॉकडाऊन आहे.
काल शुक्रवारी शासकीय रुग्णालयातील लॅब मध्ये दुपारी १ वाजता ३९, सायंकाळी २९ तर रात्री १८ रुग्ण असे एकूण ८६ तर खाजगी लॅबमध्ये दिवसभरात ३१ असे मिळून ११७ नवे रुग्ण समोर आले आहेत. दुसरीकडे शुक्रवारी२२ रुग्ण कोरोनातुन बरे होऊन घरी परतले आहे. आजपर्यंत ७९४ रुग्ण बरे झालेत. आतापर्यंत ३३ रुग्ण दगावले आहेत. सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण ६१६ इतके आहेत. आजपर्यंत नोंद झालेली पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या १४३९ इतकी झाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात ११७ रुग्ण कोरोनाबाधित, पाथर्डी शहर पूर्ण लॉकडाऊन - pathardi corona latest news
शासकीय रुग्णालयातील लॅब मध्ये दुपारी १ वाजता ३९, सायंकाळी २९ तर रात्री १८ रुग्ण असे एकूण ८६ तर खाजगी लॅबमध्ये दिवसभरात ३१ असे मिळून ११७ नवे रुग्ण समोर आले आहेत. दुसरीकडे शुक्रवारी२२ रुग्ण कोरोनातुन बरे होऊन घरी परतले आहे. आजपर्यंत ७९४ रुग्ण बरे झालेत.