अहमदनगर - भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कानिफनाथांची मढी यात्रा सध्या सरू झाली आहे. पंचमीला यात्रेचा मुख्य दिवस आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा, तालुका, महसूल, पोलीस, आरोग्य प्रशासनाने सध्या कोरोना विषाणूच्या धोक्याची संभाव्यता पाहता विशेष बैठक घेऊन मानकरी, नाथभक्तांना विशेष सूचना जारी केल्या आहेत.
होळीच्या सणापासून या यात्रेस सुरुवात होते. तर रंगपंचमीला यात्रेचा मुख्य दिवस असतो. राज्यासह परराज्यातून भटका समाज या यात्रेस उपस्थित राहत असतो. यामुळे भक्तांची मोठी संख्या असल्याने आणि यंदा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भक्तांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा -साईबाबा मंदिरात उत्साहात पार पडले होळी दहन
जिल्हा-तालुका प्रशासन, पोलीस, आरोग्य, पाथर्डी पंचायत, मढी देवस्थान ट्रस्ट यांनी एकत्रित बैठक घेत भक्तांना विशेष सूचना जारी करत त्या सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे. यात्रा कालोत्सव पाहता एकाच दिवशी भक्तांनी येण्याचे टाळावे, येताना स्वछता पाळावी, चेहऱ्यावर रुमालचा वापर करावा, या सूचना भक्तांना देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभाग आणि देवस्थानच्या वतीने विशेष आरोग्य पथके तयार करण्यात आली असून गरज वाटल्यास भक्तांना या ठिकाणी आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत.
हेही वाचा -अहमदनगर: श्री संत शेख महंमद महाराज हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक; उत्साहात यात्रेला सुरुवात..