ETV Bharat / state

Truck-Auto Rickshaw Accident : कोपरगावात ट्रक-रिक्षात भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू तर चार जखमी - ट्रक रिक्षात अपघात

कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द परिसरात झगडे फाटा कोपरगाव महामार्गावर पगारे वस्ती नजीक कंटेनरने रिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षा पूर्ण चक्काचूर झाला. या अपघातात दोन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी, दोन महिला, व दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला. ॲपे रिक्षा मधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

ट्रक-रिक्षात भीषण अपघात
ट्रक-रिक्षात भीषण अपघात
author img

By

Published : May 6, 2022, 12:34 PM IST

Updated : May 6, 2022, 1:48 PM IST

अहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द पगारे वस्तीजवळ कंटेनर आणि ॲपे रिक्षात भीषण अपघात झाला. अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. यात दोन कॉलेजच्या विद्यार्थिनी, दोन महिला व दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चारजण गंभीर जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींना तातडीने कोपरगाव येथील ग्रमीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

कोपरगावात ट्रक-रिक्षात भीषण अपघात

सहा जणांचा मृत्यू - कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द परिसरात झगडे फाटा कोपरगाव महामार्गावर पगारे वस्ती नजीक कंटेनरने रिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षा पूर्ण चक्काचूर झाला. या अपघातात दोन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी, दोन महिला, व दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला. ॲपे रिक्षा मधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. झगडे फाट्यावरून ॲपे रिक्षा पॅसेंजर घेऊन कोपरगावकडे जात असताना पगारे वस्ती जवळ कोपरगावहुन येत असलेल्या कंटेनरने जोरात धडक दिली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून या कंटेनरने दोन मोटरसायकल स्वरांना देखील चिरडले आहे. ते देखील गंभीर जखमी झाले आहे. जखमींना कोपरगाव ग्रमीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर पोलीस दाखल झाले
अपघातानंतर पोलीस दाखल झाले

मृतांची नावे -

  • राजाबाई साहेबराव खरात (वय ६० वर्षे रा. चांदेकसारे)
  • आत्माराम जम्मानसा नाकोडे (वय ६५ वर्षे रा. वावी)
  • पुजा नानासाहेब गायकवाड (वय २० वर्षे रा. हिंगणवेढे)
  • प्रगती मधुकर होन (वय २० वर्षे रा. चांदेकसारे)
  • शैला शिवाजी खरात (वय ४२ वर्षे रा.श्रीरामपुर)
  • शिवाजी मारुती खरात (वय ५२ रा. श्रीरामपूर)

Last Updated : May 6, 2022, 1:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.