शिर्डी / अहमदनगर : शिर्डीला येणारे साईभक्त आपल्या परीने साई चरणी दान अर्पण करत असतात. या नवीन 2024 वर्षाच्या सुरुवातीला साईबाबांना सर्वात मोठे दान बंगुळुरु येथील एका साई भक्त परिवाराने केलंय. बंगुळुरु येथील साईभक्त डॉ. राजाराम कोटा यांनी 29 लाख 4 हजार 982 रुपये किंमतीचा सोन्याचा सुवर्ण मुकुट साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिलाय.
सुवर्ण मुकुट : नाताळा आणि नवीन वर्षानिमित्ताने भाविकांनी साई चरणी भरभरुन दान केलंय. आज बंगुळुरु येथील साईभक्त डॉ. राजाराम कोटा व कुटुंब यांनी 504.600 ग्रॅम वजनाचा 29 लाख 04 हजार 982 रुपये किंमतीचा सोन्याचा मुकुट साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिलाय. हा सुवर्ण मुकुट साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने राजाराम कोटा व यांच्या परिवाराचा साईबाबांची मूर्ती व शॉल देऊन सन्मान करण्यात आला.
काही दिवसांपूर्वीच झालं होतं दान : साईबाबा संस्थानला 83 ग्राम वजनाचे 4 लाख 77 हजार रुपये किमतीचं सुवर्णफूल देणगी स्वरुपात प्राप्त झालं आहे. भुवनेश्वर येथील साईभक्त संभूनाथ सवाई यांनी हे सुवर्ण दान संस्थानला दिलं आहे. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवले यांच्याकडे दान सुपुर्द करण्यात आले असून देणगीदार सवाई यांचा साई संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सव्वा तीन लाखाची दुचाकी दान : नव्यानेच लॉन्च केलेली सव्वा तीन लाख रुपये किमतीची अपाचे 310 ही दुचाकी कंपनीनेच साईबाबा संस्थानला दान स्वरूपात दिली आहे. या दुचाकीचे साई मंदिर परिसरात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. यावेळी टीव्हीएस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुचाकीची किल्ली संस्थान अधिकाऱ्यांकडे सुपुर्द केली.
हेही वाचा :
1 जॅकी श्रॉफ, रणदीप हुडा आणि धनुष यांनाही राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रण
2 महाविकास आघाडीचा लोकसभा जागावाटपाचा तिढा सुटणार? आज दिल्लीत महत्वाची बैठक
3 राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्र्यांना भेटत असतील तर शंकेला वाव-शरद पवार