ETV Bharat / state

जामखेडमध्ये सहा लाखांचा गुटखा जप्त; गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई - अहमदनगर

पथकाने आरोपीच्या घरी छापा टाकून झडती घेतली असता घरात लपवून ठेवलेला गुटख्याचा साठा सापडला. जप्त केलेला गुटखा जामखेड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

जामखेडमध्ये सहा लाखांचा गुटखा जप्त
author img

By

Published : Jun 4, 2019, 8:14 AM IST

अहमदनगर - जामखेड तालुक्यातील नान्नज गावात राहणाऱ्या अमजद निजाम पठाण याच्या राहत्या घरात असलेला सहा लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलीस कारवाईची चाहूल लागल्याने आरोपी अमजद पठाण हा फरार झाला आहे.

जामखेडमध्ये सहा लाखांचा गुटखा जप्त; गुन्हे अन्वेषणची कारवाई

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक औताडे यांना गुप्त खबऱयाकडून नान्नज येथील अमजद पठाण याच्या घरात चोरीचा माल असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे पथकाने आरोपीच्या घरी छापा टाकून झडती घेतली असता घरात लपवून ठेवलेला गुटख्याचा साठा सापडला. जप्त केलेला गुटखा जामखेड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य प्रतिबंधीत खाद्य पदार्थांमधे गुटख्याचा समावेश असल्याने अन्न आणि औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात कळवण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर फडतरे यांनी दिली आहे.

या कारवाईत गुन्हे अन्वेषणचे सुनील चव्हाण, फकीर शेख, संभाजी कोतकर, संदीप दरंदले, रोहित मिसाळ या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Intro:अहमदनगर- जामखेड मधे सहा लाखाचा गुटखा जप्त, गुन्हे अन्वेषणची कारवाई.Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_lcb_gutakha_seal_2019_vij1_7204297

अहमदनगर- जामखेड मधे सहा लाखाचा गुटखा जप्त, गुन्हे अन्वेषणची कारवाई.

अहमदनगर- जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील नान्नज गावात राहणाऱ्या अमजद निजाम पठाण याच्या राहत्या घरात असलेला गोवा-1000 गुटखा जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. या गुटख्याची किंमत सहा लाख दहा हजार इतकी असून पोलीस कारवाईची चाहूल लागल्याने आरोपी अमजद पठाण हा फरार झाला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक औताडे यांना गुप्त खबर्याकडून नान्नज येथील अमजद पठाण याच्या घरात चोरीचा माल असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आरोपीच्या घरी छापा टाकून झडती घेतली असता घरात लपवून ठेवलेला गुटख्याचा साठा सापडला. जप्त केलेला गुटखा जामखेड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य प्रतिबंधित खाद्य पदार्था मधे गुटख्याचा समावेश असल्याने अन्न आणि औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर फडतरे यांनी दिली आहे. या कारवाईत गुन्हे अन्वेषणच्या हेड कॉन्स. सुनील चव्हाण फकीर शेख, संभाजी कोतकर, संदीप दरंदले, रोहित मिसाळ या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- जामखेड मधे सहा लाखाचा गुटखा जप्त, गुन्हे अन्वेषणची कारवाई.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.