ETV Bharat / state

अहमदनगर शहराचा आज 531वा स्थापना दिवस; अहमदशहा बहिरीने वसवलं शहर - अहमदनगर शहर 531वा स्थापना दिवस

पंधराव्या शतकाच्या शेवटी इसवी सन 1486मध्ये बहामनी राज्याची पाच शकले झाली. त्यामधून फुटून निघालेल्या अहमदशहा बहिरी या निजामशहाने 28 मे 1490रोजी सीना नदीकाठी शहर वसविण्यास सुरुवात केली. हाच दिवस नगरचा स्थापना दिवस म्हणून ओळखला जातो.

531st foundation day ahmednagar
अहमदनगर शहराचा आज 531वा स्थापना दिवस
author img

By

Published : May 28, 2021, 10:34 AM IST

Updated : May 29, 2021, 6:34 AM IST

अहमदनगर - एके काळी बगदाद, कैरो या समृद्ध शहरांशी तुलना होत असलेले अहमदनगर हे या शहराचा आज 531वा स्थापना दिवस आहे. या शहराचा इतिहास समृद्ध आहे. अनेक ऐतिहासिक वास्तू नगर शहरात आणि शहरालगत आहेत. तर यातील अनेक वास्तू दुर्लक्षित होऊन पडझड अवस्थेत आहेत.

मोजक्या स्थापित शहरांपैकी एक ऐतिहासिक शहर -

पंधराव्या शतकाच्या शेवटी इसवी सन 1486मध्ये बहामनी राज्याची पाच शकले झाली. त्यामधून फुटून निघालेल्या अहमदशहा बहिरी या निजामशहाने 28 मे 1490रोजी सीना नदीकाठी शहर वसविण्यास सुरुवात केली. हाच दिवस नगरचा स्थापना दिवस म्हणून ओळखला जातो. कोटबाग निजाम हा राजवाडा बांधून नगरची स्थापना झाली. त्याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. त्यानंतर चारच वर्षांत शहराची पूर्ण स्थापना होऊन अहमदनगर निजामशाहीची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी होत होती.

हेही वाचा - जिल्ह्यात सर्वप्रकारचे बेड्स मुबलक प्रमाणात उपलब्ध - जिल्हाधिकारी

भुईकोट किल्ला हे शहराचे वैशिष्ट्य -

1490मध्ये बांधलेला हा किल्ला नगरचे वैभव ठरला आहे. याच किल्ल्यात 1942च्या 'चले जाव' चळवळीत पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह अन्य नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. यावेळी स्थानबद्ध असलेले पंडित नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया (भारत एक खोज) हा नऊशे पानांचा ग्रंथ लिहला. पंडित नेहरूंसह स्थानबद्ध असलेल्या राष्ट्रपुरुषांच्या आठवणी विविध वस्तूरूपात भुईकोट किल्ल्यात जतन करून ठेवल्या आहेत.

अनेक वास्तूं नगरची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या -

या शहरातील विविध वास्तू आजही सुस्थितीत आहेत. चांदबीबी महाल (सलाबतखान दुसरा याची कबर) ही इमारत 1580मध्ये बांधण्यात आली. या ठिकाणी सलाबतखानासह त्याच्या दोन पत्नी आणि मुलांचीही कबर आहे. दमडी मशीद 1567मध्ये साहीरखान याने बांधली. कोटलाबारा इमाम हे ठिकाण 1536मध्ये बुऱ्हाण निजामशहा यांनी स्थापन केले. बाग रौझा ही काळ्या दगडांनी बांधलेली सुंदर इमारत आहे. अहमद निजामशहाचे ते निवासस्थान होते. फराहबाग पॅलेस ही सुंदर वास्तू 1508च्या दरम्यान निजामशहाचा मुलगा बुऱ्हाणशहाच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात आली. औरंगजेबाची कबर 1707मध्ये भिंगारजवळ बांधण्यात आली. तेथे औरंगजेबाला दफन करण्यात आले आहे. लष्कराचे मुख्यालय, सेंट जॉन कॅथलिक चर्च, आनंद धाम, ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय, कॅव्हलरी टॅंक संग्रहालय, मेहेरबाबांची समाधी, अशी काही स्थाने नगरची ओळख दर्शवितात.

आशिया खंडातले मोठे खेडे अशीच ओळख -

शहराची स्थापना होऊन साडेपाचशे वर्षे उलटली तरी शहराची प्रगती, सुधारणा, अधुनिकपणा हा अजूनही तसा दिसत नाही. त्यामुळे नगर शहराला आशिया खंडातील एक मोठे खेडे असे अनेकजण विनोदाने म्हणतात. नावात काना, मात्रा, उकार नसलेले म्हणून सरळमनाचे नगरी लोक असतात, असेही म्हटले जाते. मात्र, नगरच्या आजूबाजू असलेले औरंगाबाद, नाशिक, पुणे आदी शहरांनी मोठा औद्योगिक विकास केला. तसा औद्योगिक विकास न झाल्याने शहराची आर्थिक घडी अशीतशीच राहिली. परिणामी शहराचा नागरी विकास आजही म्हणावा तसा झालाच नाही. किमान आजही असलेल्या अनेक इतिहासाची वेगळी ओळख ठेवून असलेल्या भव्य-दिव्य वास्तूंचे जतन करून शहराला ऐतिहासिक पर्यटनासाठी विशेष प्रयत्न केल्यास शहराची आर्थिक भरभराट शक्य आहे.

हेही वाचा - दिवंगत विलासराव देशमुख हे राज्यातील कार्यकर्त्यांचे प्रेरणास्त्रोत - आमदार डॉ. सुधीर तांबे

Last Updated : May 29, 2021, 6:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.