ETV Bharat / state

शनिशिंगणापूरमध्ये चौथऱ्यावरून शनिदर्शन खुले, भरावे लागणार 500 रुपये शुल्क - Shani Shingnapur shani temple

शनैश्वर देवस्थान ट्रस्टने पाचशे रुपये शुल्क घेऊन भक्तांना ( fee for god shani darshan from shani chauthara ) शनिचौथरा दर्शन खुले केले आहे. चौथऱ्यावर पूजासाहित्याला ( Shani Shingnapur shani darshan ) बंदी असून फक्त तैलाभिषेकाकरिता परवानगी देण्यात ( Shani Shingnapur shani temple ) आली आहे. काल सायंकाळी पाच वाजेपर्यंत सहाशे भक्त या योजनेत सहभागी झाले होते.

fee for god shani darshan from shani chauthara
शनिचौथरा दर्शन शनिशिंगणापूर
author img

By

Published : Jun 19, 2022, 1:36 PM IST

Updated : Jun 19, 2022, 2:07 PM IST

अहमदनगर - शनैश्वर देवस्थान ट्रस्टने पाचशे रुपये शुल्क घेऊन भक्तांना ( fee for god shani darshan from shani chauthara ) शनिचौथरा दर्शन खुले केले आहे. चौथऱ्यावर पूजासाहित्याला ( Shani Shingnapur shani darshan ) बंदी असून फक्त तैलाभिषेकाकरिता परवानगी देण्यात आली आहे. काल सायंकाळी पाच वाजेपर्यंत सहाशे भक्त या योजनेत सहभागी झाले होते. त्यातून तीन लाखांची देणगी शनैश्वर देवस्थान ट्रस्टला जमा झाली.

प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई

हेही वाचा - shirdi school water problem : शुद्ध पिण्याच्या पाण्याचे पैसे यांनी भरले

मागील काही वर्षांत कोरोना व सुरक्षेच्या कारणास्तव चौथऱ्यावरील दर्शन बंद करण्यात आले होते. याबाबत मागील आठवड्यात निर्णय झाला. आपल्या हाताने तेल अर्पण करण्याची इच्छा असणाऱ्या भक्तांना आता पाचशे रुपय शुल्क द्यावे लागणार आहे. या देणगीचा विकासकामांसाठी उपयोग होईल, असे मत शनैश्वर देवस्थानचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी व्यक्त केले.

भाविक काय म्हणतात? - शुल्क घेऊन चौथऱ्यावरून दर्शनाचा निर्णय खूपच चांगला आहे. काळ्या तिळाच्या नावाखाली सुरू असलेली भक्तांची फसवणूक थांबवावी, अशी मागणी गुजरात बडोदा येथील शनि भक्त परेश पटेल यांनी केली आहे.

भेदभाव करणारा निर्णय - तृप्ती देसाई

हा निर्णय भाविकांमध्ये भेदभाव निर्माण करणारा आहे. त्यामुळे हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी दिला आहे. शनिशिंगणापूर येथील चौथऱ्यावर पुरुष, महिला आणि तृतीयपंथींना दर्शनासाठी प्रवेश द्यावा. या मागणीसाठी आपण यापूर्वी आंदोलन केले. त्यानंतर चौथऱ्यावर प्रवेश देण्यास सुरुवात झाली. गरीब भाविक पाचशे रुपये देऊन चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेऊ शकत नाही. या निर्णयामुळे गरीब आणि श्रीमंत भेद निर्माण होईल. अनेक देवस्थानांमध्ये भाविकांसाठी सशुल्क प्रवेशासाठी स्वतंत्र व्यवस्था असते. वेळे अभावी रांगांमध्ये थांबणे शक्य नसते. असे भाविक सशुल्क दर्शन घेतात. अशी व्यवस्था असेल तर त्यास विरोध राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - Sai Baba Temple Shirdi : पुण्याच्या भाविकाकडून साई चरणी 5 हजार आंबे दान

Last Updated : Jun 19, 2022, 2:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.