शिर्डी - शिर्डीतील दुचाकी चालकांना पोलिसांनी चांगलाच धक्का दिला आहे. ज्या दुचाकीचे कागदपत्रे आणि नंबर प्लेट दुरुस्ती नाही, अशा वाहनांवर शिर्डी पोलिसांनी रविवारी (आज) पहाटे अचानक कोंबिंग ऑपरेशन करून कागदपत्र नसलेल्या तब्बल 32 दुचाकी जप्त केल्या आहेत. यामुळे अनेक नागरिकांना धक्का बसला आहे.
शिर्डी शहरात दिवसेंदिवस दुचाकी चोरी जाण्याच्या तसेच चोरीच्या दुचाकी खरेदी करण्याचा घटना घडत आहे. यामुळेच शिर्डी पोलिसांनी शहरात पहाटे कोंबिंग ऑपरेशन केले आहे. शहरातील कालिकानगर बाजारतळ या ठिकाणी पोलिसांनी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास कोंबिंग ऑपरेशन केले. ज्या घरासमोर दुचाकी दिसेल त्या घरातील लोकांना उठून दुचाकींचे कागदपत्रांची तपासणी केली. ज्या लोकांकडे दुचाकीचे कागदपत्र नाही, फॅन्सी नंबर प्लेट आहेत, अशा 32 दुचाकी जप्त केले आहे. ज्या वाहनाधारकांकडे दुचाकीचे सर्व कागदपत्रे आहेत, त्यांची चौकशीकरुन वाहन परत करण्यात आले आहे. या कारवाईमुळे चोरीच्या घटनेला आळा बसणार असून हे कोंबिंग ऑपरेशन महिन्यातून तीन दिवस शहरातील विविध भागात करण्यात येणार असल्याची माहिती शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा - Thane : किरकोळ वादातून तरुणाच्या डोक्यात मारला मोठा दगड