अहमदनगर - कोपरगाव येथील मनईवस्तीत एका 22 वर्षीय महिलेचा ग्रामीण रुग्णालयात आज (शुक्रवार) मृत्यू झाला. मृत महिला सारी आजाराने संशयित असल्याने तिचे स्त्राव तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
मृत महिलेच्या मृतदेहावर कोपरगाव अमरधाम येथे प्रशासनाच्या निगराणीखाली अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तसेच सदर महिला ज्या भागात राहत होती, तो भाग प्रशासनाच्यावतीने सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.