ETV Bharat / sports

टोकियो पॅरालिम्पिक 2020 : पहिल्यांदाच भारताची टेबल टेनिस खेळाडू उपांत्यफेरीत; भाविना पटेलची कामगिरी - पॅरालिम्पिक महिला टेबल टेनिस स्पर्धा

पॅरालिम्पिकमध्ये महिला टेबल टेनिस स्पर्धेत उपांत्यफेरीत प्रवेश करणारी भाविना ही पहिली भारतीय खेळाडू आहे. उपांत्यफेरीत भाविनाचा सामना शनिवारी चीनच्या झांग मिआशी होणार आहे.

भाविना पटेल
भाविना पटेल
author img

By

Published : Aug 27, 2021, 9:55 PM IST

टोकियो - पहिल्यांदाच भारताची टेबल टेनिस खेळाडू टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये उपांत्यफेरीत पोहोचली आहे. भाविना पटेल असे महिला टेबल टेनिसमध्ये इतिहास रचणाऱ्या खेळाडूचे नाव आहे. 34 वर्षीय भाविना ही अहमदाबादची खेळाडू आहे.

भाविना पटेलने 2016 मध्ये टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेत्या बोरिसलावा पेरिच रांकोविचन यांना 3-0 ने हरवून उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. भाविनाने 19 मिनिटाच्या खेळात रांकोविचला 11-5,11-6, 11-7 ने पराभूत केले. पॅरालिम्पिकमध्ये महिला टेबल टेनिस स्पर्धेत उपांत्यफेरीत प्रवेश करणारी भाविना ही पहिली भारतीय खेळाडू आहे. उपांत्यफेरीत भाविनाचा सामना शनिवारी चीनच्या झांग मिआशी होणार आहे.

हेही वाचा-ENG vs IND 3rd Test :पहिल्या डावात इंग्लंडच्या ४३२ धावा; भारताविरोधात ३५४ धावांची मजबूत आघाडी

दोन नॉकआउट सामन्यानंतर पदकावर शिक्कामोर्तब

दरम्यान, भाबिनाबेन टोकियो पॅराऑलिम्पिकच्या पहिल्या सामन्यात पराभूत झाली होती. तिला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली चीनची खेळाडू हाउ यिंग हिने 3-0 ने पराभूत केले होते. यामुळे तिला मेगानविरुद्धचा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागणार होता. यात तिने विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान राखले. भाविनाबेन दोन सामन्यात 3 गुण मिळवत नॉकआउट फेरीसाठी पात्र ठरली.

हेही वाचा-न्यूझिलंडचा माजी कर्णधार ख्रिस केन्सला शस्त्रक्रियेच्यावेळी पक्षाघाताचा झटका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.