ETV Bharat / sports

विम्बल्डनच्या महासंग्रामाला आजपासून सुरुवात, कोण मारणार बाजी? - tennis

गतवर्षी या स्पर्धेचे जेतेपद हे सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने पटकावले होते. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या ८ व्या मानांकित कोरी अॅडरनसनचा पराभव केला होता. टेनिसचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखला जाणारा स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडररने आतापर्यंत विक्रमी सर्वाधिक ८ वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

विम्बल्डनच्या महासंग्रामाला आजपासून सुरूवात
author img

By

Published : Jul 1, 2019, 7:43 PM IST

लंडन - टेनिस हा क्रीडा प्रकारातील एक सर्वात प्रतिष्ठेचा खेळ म्हणून ओळखला जातो. त्याच टेनिस विश्वातील सर्वात जुनी आणि सर्वात मानाची असलेली विम्बल्डन ओपनच्या स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या मुख्य फेरीला सोमवारपासून सुरू होणार असून पुरुष एकेरीत रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच आणि डोमॅनिक थीम यांना उच्च मानांकन देण्यात आले आहे.

गतवर्षी या स्पर्धेचे जेतेपद हे सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने पटकावले होते. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या ८ व्या मानांकित कोरी अॅडरनसनचा पराभव केला होता. टेनिसचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखला जाणारा स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडररने आतापर्यंत विक्रमी सर्वाधिक ८ वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. महिला एकेरीचा विचार केला असता नुकताच फ्रेंच ओपनचा किताब पटकावणारी ऑस्ट्रेलियाची अ‍ॅश्ले बार्टी, गतविजेती अँजेलिक कर्बर आणि जपानची नाओमी ओसाका यांना विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानण्यात येत आहे. नुकत्याच फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीमध्ये फेडररला आपल्या कट्टर प्रतिद्वंदी स्पेनच्या राफेल नदालकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या जर्मनीतील हॅले एटीपी स्पर्धेत त्याने विजेतेपद पटकावून सर्वांना सावधानतेचा इशारा दिला होता.

फेडररचे वय सध्या ३७ वर्षे आहे. या वयामध्ये आतापर्यंत कोणीही ग्रॅडस्लॅम जिंकलेला नाही. त्यामुळे फेडररकडे ही संधी आहे. फेडररचा फॉर्म पाहता तो यंदा विक्रमी नवव्यांदा हा किताब जिंकेल अशी आशा तमाम टेनिसप्रेमींना वाटत आहे. तर दुसरीकडे स्पेनचा राफेल नदाल आणि सर्बियाच्या नोवाक जोकोविचही आपला बहारदार खेळ दाखवत आहेत. तेही विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. नदालने विक्रमी १२ व्यांदा फ्रेंच ओपनचा किताब जिंकला आहे. तर जोकोविच गतवर्षाचा विम्बल्डन विजेता आहे. त्यामुळे फेडररला पुन्हा विम्बल्डनला गवसणी घालणे अवघड असल्याचे बोलले जाते. मात्र, फेडररचा बॅकहॅड हा जगातील सर्वात परफेक्ट आहे. त्यासोबतच त्याचे फोरहॅडही जबरदस्त आहेत. त्यामुळे फेडररचे शॉट परफेक्टच आहेत. त्याची सर्व्हिसही १८० किमीच्या वेगाने आहे. तसेच त्याचा अनुभवही त्याच्या कामी येऊ शकतो. त्यामुळे फेडरर यंदा जोरदार मुसंडी मारेल यात शंका नाही.

यंदा विम्बल्डनच्या महासंग्रामात दिसणार प्रज्ञेश गुणेश्वरनवर हा एकेमव भारतीय खेळाडू दिसणार आहे, जो या स्पर्धेत पुरुष एकेरीत भारतासाठी खेळेल. तर पुरुष दुहेरीत लिएण्डर पेस, दिविज शरण आणि रोहन बोपण्णा हे खेळताना दिसून येतील.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.