ETV Bharat / sports

दिग्गज सेरेना विल्यम्सची यूएस ओपनमधून माघार, दिले 'हे' कारण

author img

By

Published : Aug 25, 2021, 7:48 PM IST

टेनिस दिग्गज सेरेना विल्यम्सने दुखापतीमुळे पुढील आठवड्यापासून सुरूवात होणाऱ्या यूएस ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे.

Serena Williams withdraws from US Open due to injury
दिग्गज सेरेना विल्यम्सची यूएस ओपनमधून माघार, दिले 'हे' कारण

न्यूयॉर्क - टेनिस दिग्गज सेरेना विल्यम्सने पुढील आठवड्यापासून सुरूवात होणाऱ्या यूएस ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. याची माहिती सेरेनाने आज सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. दरम्यान, सेरेनाच्या पायाला दुखापत झाली होती. ती अद्याप यातून पूर्णपणे सावरलेली नाही. याच कारणाने तिने यूएस ओपन मधून देखील माघार घेतली आहे.

सहा वेळची यूएस ओपन विजेती सेरेना विल्यम्स विम्बल्डन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभूत झाली होती. 39 वर्षीय सेरेना 24व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या शोधात आहे. पण सद्या तिला दुखापतीमुळे बेजार केले आहे. तिने याआधी दुखापतीमुळे टोकियो ऑलिम्पिक आणि सिनसिनाटी ओपनमधून माघार घेतली होती.

सेरेना विल्यम्सने इंन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. यात ती म्हणते की, डॉक्टर्स तसेच आरोग्य टीमशी चर्चा केल्यानंतर, दुखापत पूर्णपणे ठीक होण्यासाठी वेळ देण्याचा निर्णय घेतला. यामुळे मी यूएस ओपनमधून माघार घेत आहे.

दरम्यान, सेरेना विल्यम्सच्या आधी स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल आणि गतविजेता डॉमिनिक थिएम यांनी देखील यूएस ओपनमधून माघार घेतली आहे.

हेही वाचा - विम्बल्डनमध्ये एका महिलेवर फोकस झाला कॅमेरा, प्रेक्षकांनी उभे राहून केला टाळ्याचा कडकडाट

हेही वाचा - Tokyo Olympics : नोवाक जोकोव्हिचचा संताप; रागाच्या भरात तोडलं रॅकेट, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.