ETV Bharat / sports

टेनिस : इटालियन ओपन स्पर्धेतून सेरेना विल्यम्स परतणार कोर्टवर - Return

मार्चमध्ये झालेल्या मियामी ओपनमध्ये तिसऱ्या फेरीत पराभूत झाल्यानंतर सेरेनाने एकही स्पर्धा खेळली नाहीय. 2016 मध्ये सेरेनाने चौथ्यांदा इटालियन ओपन टेनिस स्पर्धा जिंकली होती.

सेरेना विल्यम्स
author img

By

Published : May 4, 2019, 8:06 PM IST

रोम - अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्स आगामी इटालियन ओपन टेनिस स्पर्धेतून टेनिस कोर्टवर परतण्यासाठी सज्जा झाली आहे. स्पर्धेचे संचालक सर्जियो पालमेरी यांनी सांगितले, की सेरेनाने या स्पर्धेसाठी आपला रूम बुक केला असून स्पर्धेपूर्वी काही दिवस ती येथे पोहोचेल. इटालियन ओपन टेनिस टूर्नामेंट 13 ते 19 दरम्यान खेळली जाणार आहे.

सेरेनाशिवाय स्वित्झर्लंडचा रॉजर फेडररदेखील या स्पर्धेत सहभागी होणार आहे. तर, जागतिक क्रमवारीत 6 स्थानी असलेला केव्हिन अँडरसन आणि 16व्या स्थानी असलेल्या मिलोस रोआनिकने दुखापतीमुळे या स्पर्धेतुन माघार घेतली आहे.

रशियाच्या मारिया शारापोव्हाने खांद्याच्या दुखापतीमुळे इटालियन ओपन टेनिस स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे. या स्पर्धेच्या आयोजकांकडून व्हीनस विल्यम्स आणि व्हिक्टोरिया अजारेंका यांना वाईल्ड कार्ड देण्यात आले आहे.

Intro:Body:

Sports 07

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.