ETV Bharat / sports

ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सानिया घेणार भाग, पण...

author img

By

Published : Jan 22, 2020, 8:25 PM IST

मिश्र दुहेरीमधून बाहेर पडली असली तरी सानिया महिला दुहेरीत प्रवेश नोंदवणार आहे. सानिया युक्रेनच्या नादिया किचेनोकबरोबर मैदानात पाऊल ठेवणार आहे. महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत सानिया आणि नादियाचा सामना चीनच्या झिनयुन हान आणि लिन झे जोडीशी होईल.

sania mirza pulls out of mixed doubles in australia open due to calf injury
ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सानिया घेणार भाग, पण.....

मेलबर्न - भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा वर्षाच्या पहिल्या ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीमधून बाहेर पडली आहे. सानियाने दुखापतीमुळे हा निर्णय घेतला. रोहन बोपन्नासोबत सानिया मिश्र दुहेरीत भाग घेणार होती.

हेही वाचा - बंगळुरुच्या १७ वर्षीय यश अराध्याची गरूडझेप

मिश्र दुहेरीमधून बाहेर पडली असली तरी सानिया महिला दुहेरीत प्रवेश नोंदवणार आहे. सानिया युक्रेनच्या नादिया किचेनोकबरोबर मैदानात पाऊल ठेवणार आहे. महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत सानिया आणि नादियाचा सामना चीनच्या झिनयुन हान आणि लिन झे जोडीशी होईल.

'दुर्दैवाने, जेव्हा मी हॉबार्ट फायनलमध्ये माझा पहिला खेळ खेळत होते तेव्हा मला ही दुखापत झाली. मी महिला दुहेरी खेळण्यास तयार आहे. तथापि, मला दु:ख आहे की, मी मिश्र दुहेरीत भाग घेऊ शकणार नाही', असे सानियाने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.

सानिया मिर्झाने दोन वर्षांनंतर पुनरागमन करताना, होबार्ट इंटरनॅशनल स्पर्धचे विजेतेपद पटकावले. ३३ वर्षीय सानियाने आपली युक्रेनची जोडीदार नादिया किचेनोक हिच्यासह खेळताना, कारकिर्दीतील ४२ वा डब्ल्यूटीए किताब जिंकला. दरम्यान, मुलाला जन्म दिल्यानंतर सानियाचे हे पहिलेच विजेतेपद आहे.

Intro:Body:

ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सानिया घेणार भाग, पण.....

मेलबर्न - भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा वर्षाच्या पहिल्या ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीमधून बाहेर पडली आहे. सानियाने दुखापतीमुळे हा निर्णय घेतला. रोहन बोपण्णासोबत सानिया मिश्र दुहेरीत भाग घेणार होती.

हेही वाचा -

मिश्र दुहेरीमधून बाहेर पडली असली तरी सानिया महिला दुहेरीत प्रवेश नोंदवणार आहे. सानिया युक्रेनच्या नादिया किचेनोकबरोबर मैदानात पाऊल ठेवणार आहे. महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत सानिया आणि नादियाचा सामना चीनच्या झिनयुन हान आणि लिन झे जोडीशी होईल.

'दुर्दैवाने, जेव्हा मी हॉबार्ट फायनलमध्ये माझा पहिला खेळ खेळत होते तेव्हा मला ही दुखापत झाली. मी महिला दुहेरी खेळण्यास तयार आहे. तथापि, मला दु: ख आहे की मी मिश्र दुहेरीत भाग घेऊ शकणार नाही', असे सानियाने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.

सानिया मिर्झाने दोन वर्षांनंतर पुनरागमन करताना, होबार्ट इंटरनॅशनल स्पर्धचे विजेतेपद पटकावले. ३३ वर्षीय सानियाने आपली युक्रेनची जोडीदार नादिया किचेनोक हिच्यासह खेळताना, कारकिर्दीतील ४२ वा डब्ल्यूटीए किताब जिंकला. दरम्यान, मुलाला जन्म दिल्यानंतर सानियाचे हे पहिलेच विजेतेपद आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.