ETV Bharat / sports

दोन वर्षानंतर पुनरागमन केलेल्या सानियाने गाठली अंतिम फेरी - सानिया मिर्झा अंतिम फेरीत न्यूज

दोन वर्षानंतर टेनिसकोर्टवर पाय ठेवलेल्या सानियाने किचेनोकसमवेत उपांत्य फेरीत चेक प्रजासत्ताकची मेरी बाउज्कोवा आणि स्लोवेनियाची तमारा जिदानसेक या जोडीला ७-६ (३), ६-२ असे हरवले. हा सामना दीड तास रंगला होता.

sania mirza into women's doubles final of Hobart International with her Ukrainian partner Nadia Kichenok.
दोन वर्षानंतर पुनरागमन केलेल्या सानियाने गाठली अंतिम फेरी
author img

By

Published : Jan 17, 2020, 2:04 PM IST

होबार्ट - भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने डब्ल्यूटीए सर्किटमध्ये दमदार पुनरागमन केले आहे. सानियाने युक्रेनच्या नादिया किचेनोकसमवेत होबर्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

हेही वाचा - INDvsAUS : नाणेफेक जिंकून कांगारूंचा गोलंदाजीचा निर्णय

दोन वर्षानंतर टेनिसकोर्टवर पाय ठेवलेल्या सानियाने किचेनोकसमवेत उपांत्य फेरीत चेक प्रजासत्ताकची मेरी बाउज्कोवा आणि स्लोवेनियाची तमारा जिदानसेक या जोडीला ७-६ (३), ६-२ असे हरवले. हा सामना दीड तास रंगला होता. सानिया आणि किचेनोकने या सामन्यात १५ ब्रेक पॉईंट मिळवले. शनिवारी या जोडीचा अंतिम सामना चीनच्या झांग शुई आणि पेंग शुईशी होईल.

नवीन वर्षातील पहिले ग्रँडस्लॅम असलेल्या ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सानिया रोहन बोपण्णा सोबत मैदानावर उतरू शकते. राजीव रामने या स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सानियाने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

Intro:Body:

दोन वर्षानंतर पुनरागमन केलेल्या सानियाने गाठली अंतिम फेरी

होबार्ट - भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने डब्ल्यूटीए सर्किटमध्ये दमदार पुनरागमन केले आहे. सानियाने युक्रेनच्या नादिया किचेनोकसमवेत होबर्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील  महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

 हेही वाचा -

दोन वर्षानंतर टेनिसकोर्टवर पाय ठेवलेल्या सानियाने किचेनोकसमवेत उपांत्य फेरीत चेक प्रजासत्ताकची मेरी बाउज्कोवा आणि स्लोवेनियाची तमारा जिदानसेक या जोडीला ७-६ (३), ६-२ असे हरवले. हा सामना दीड तास रंगला होता. सानिया आणि किचेनोकने या सामन्यात १५ ब्रेक पॉईंट मिळवले. शनिवारी या जोडीचा अंतिम सामना चीनच्या झांग शुई आणि पेंग शुईशी होईल.

नवीन वर्षातील पहिले ग्रँडस्लॅम असलेल्या ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सानिया रोहन बोपण्णा सोबत मैदानावर उतरू शकते. राजीव रामने या स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सानियाने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.