ETV Bharat / sports

हला ओपन स्पर्धाः रॉजर फेडरर १५ व्या वेळा उपांत्य फेरीत

स्वित्झर्लंडचा  महान टेनिस खेळाडू रॉजर फेडररने आपला शानदार फार्म कायम ठेवत ग्रास कोर्टवर सुरू असलेल्या 'हला ओपन स्पर्धे'त उपांत्य फेरीत धडक मारली आहे. फेडररने शुक्रवारी रात्री झालेल्या सामन्यान कडवी झुंज देणाऱ्या स्पेनच्या बाउटिस्टा अगुटचा ६-३, ४-६ आणि ६-४ ने पराभव केला.

रॉजर फेडरर
author img

By

Published : Jun 22, 2019, 5:01 PM IST

हला (जर्मनी) - स्वित्झर्लंडचा महान टेनिस खेळाडू रॉजर फेडररने आपला शानदार फार्म कायम ठेवत ग्रास कोर्टवर सुरू असलेल्या 'हला ओपन स्पर्धे'त उपांत्य फेरीत धडक मारली आहे. फेडररने शुक्रवारी रात्री झालेल्या सामन्यात कडवी झुंज देणाऱ्या स्पेनच्या बाउटिस्टा अगुटचा ६-३, ४-६ आणि ६-४ ने पराभव केला.

या विजयासह फेडरर अंतिम चार मध्ये दाखल झाला आहे. महत्वाचे म्हणजे फेडररने हा सामना एक तास ५३ मिनिटात जिंकला. रॉजर फेडररने आतापर्यंत हला ओपन स्पर्धेत १५ वेळा अंतिम चारमध्ये जागा मिळवली आहे. नुकत्याच झालेल्या सामन्यात फेडररला विजयाठी चांगली झुंज द्यावी लागली.

फेडररचा उपांत्य सामना फ्रान्सच्या पियरे ह्यूज हर्बर्ट विरुध्द होणार आहे. जागतिक रॅकिंगमध्ये ४३ स्थानावर असलेल्या हर्बर्टने हला ओपन स्पर्धेत आतापर्यत एकतर्फी सामने जिंकले आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.