इंडियन वेल्स (अमेरिका) - स्वित्झर्लंडच्या स्टार टेनिस खेळाडू रॉजर फेडररने इंडियन वेल्स एटीपी मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. फेडररने आज खेळण्यात आलेल्या चौथ्या फेरीत ब्रिटनच्या कायले एडमंडवर मात करत पुढील फेरीत प्रवेश केला आहे.
स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीच्या सामन्यात फेडररने एडमंडवर ६-१, ६-४ ने विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत फेडररचा सामना पोलंडच्या ह्यूबर्ट हर्कजशी होणार आहे.
टेनिसच्या जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या नोव्हाक जोकोविच आणि नाओमी ओसाका यांचा स्पर्धेच्या तिसऱ्याच फेरीत धक्कादायक पराभव झाल्याने त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.