पॅरिस - जगातील अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोविच फ्रेंच ओपनच्या तिसर्या फेरीत पोहोचला आहे. सर्बियाच्या या खेळाडूने सरळ सेटमध्ये लिथुआनियाच्या रिकॅड्रेस बेरेनकीसचा पराभव केला. गुरुवारी झालेल्या या सामन्यात जोकोविचने बेरेनकीसचा ६-१, ६-२, ६-२ असा पराभव केला. हा सामना एक तास २३ मिनिटे चालला.
-
7⃣0⃣ career wins at RG 🥳@DjokerNole races past Berankis 6-1 6-2 6-2 to advance to the third round in a tidy 1 hour and 23 minutes.#RolandGarros pic.twitter.com/NW679IlnAx
— Roland-Garros (@rolandgarros) October 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">7⃣0⃣ career wins at RG 🥳@DjokerNole races past Berankis 6-1 6-2 6-2 to advance to the third round in a tidy 1 hour and 23 minutes.#RolandGarros pic.twitter.com/NW679IlnAx
— Roland-Garros (@rolandgarros) October 1, 20207⃣0⃣ career wins at RG 🥳@DjokerNole races past Berankis 6-1 6-2 6-2 to advance to the third round in a tidy 1 hour and 23 minutes.#RolandGarros pic.twitter.com/NW679IlnAx
— Roland-Garros (@rolandgarros) October 1, 2020
रोलंड गॅरोसमध्ये जोकोविचचा हा ७०वा विजय आहे. जोकोविचने क्ले कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत सर्वाधिक विजयात स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररची बरोबरी केली आहे. या दोघांच्या पुढे राफेल नदाल (९५) आहे.
जोकोविच म्हणाला, "अर्थातच, ग्रँडस्लॅम स्पर्धेत इतके सामने जिंकणे ही एक मोठी कामगिरी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. येथे मी सर्वोत्कृष्ट टेनिस खेळण्याचा प्रयत्न करतो. मला वाटते की, फेडरर आणि नदाल हे गेल्या १०-१५ वर्षांतील सर्वात मोठे खेळाडू आहेत."
पुढच्या फेरीत जोकोविचचा सामना कोलंबियाच्या डॅनियल इलाही गलनशी होईल. हा सामना जिंकून जोकोविच फेडररला मागे टाकू शकतो.