लंडन - जागतिक क्रमवारीतील अव्वल दर्जाचा खेळाडू नोवाक जोकोव्हिच याने विम्बल्डन २०२१ ची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्याने चौथ्या फेरीत चिलीच्या ख्रिश्चियन गारिन याचा ६-२, ६-४, ६-२ अशा एकतर्फा पराभव केला. जोकोव्हिचने ख्रिश्चियनला सामन्यात एकही सेट जिंकू दिला नाही.
उपांत्य फेरीत जोकोव्हिचचा सामना हंगरीच्या मार्टन फुस्कोविक्स याच्याशी होणार आहे. जोकोव्हिचने मागील फेरीत डेनिस कुडला, केविन अँडरसन आणि जॅक ड्रापर यांना पराभूत करत चौथी फेरी गाठली होती. मार्टन याने उपउपांत्यपूर्व फेरीत पाचव्या मानांकित रुबलेव्हचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. मार्टनने रुबलेव विरुद्धचा सामना ६-३, ४-६, ४-६, ६-०, ६-३ अशा फरकाने जिंकला आहे.
इटलीच्या माट्टेओ बेरेट्टिनी याने बेलारुसचा खेळाडू इल्या इवाष्का याचा ६-४, ६-३, ६-१ असा सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
जागतिक क्रमवारीत १० व्या स्थानी असलेल्या कॅनडाचा टेनिसपटू डेनिस शापोव्हालोव्ह याने आठव्या मानांकित रॉबेर्टो ब्युटिस्टा अगुट याला पराभवाचा धक्का दिला. डेनिसने अगुटवर ६-१, ६-३, ७-५ असा धुव्वा उडवत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.
रशियाचा खेळाडू करेन खाचानोव याने अमेरिकेच्या सेबस्टियन कोर्डा याच्यावर संघर्षपूर्ण सामन्यात विजय मिळवला. खाचानोवने या सामन्यात ३-६, ६-४, ६-३, ५-७, १०-८ अशी बाजी मारली.
हेही वाचा - WI W Vs Pak W : स्टॅफनी टेलरने हॅट्ट्रिक घेत रचला इतिहास, फलंदाजीत देखील दिले मोलाचे योगदान
हेही वाचा - India vs Sri Lanka मालिका सुरु होण्याआधीच 'या' खेळाडूचे निलंबन, सोबत झाला लाखोंचा दंड