ETV Bharat / sports

टेनिसस्टार जोकोविचची कोरोनाग्रस्तांना १० लाख युरोची मदत - नोव्हाक जोकोविचची देणगी लेटेस्ट न्यूज

‘हा पैसा श्वसन यंत्र आणि इतर वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी वापरला जाईल’, असे जोकोविचने सर्बियाच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.  17 वेळा ग्रँड स्लॅम विजेता जोकोविच सध्या स्पेनच्या मार्बेल्ला येथे अडकला आहे.

Djokovic gave 1 million euros to Serbia to deal with Kovid-19
टेनिसस्टार जोकोविचची कोरोनाग्रस्तांना १० लाख युरोची मदत
author img

By

Published : Mar 27, 2020, 11:28 PM IST

माद्रिद - जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने कोरोना व्हायरसविरूद्धच्या लढ्यात योगदान देण्याचे ठरवले आहे. जोकोविचने १० लाख युरोची मदत देऊ केली असून या निधीतून वैद्यकीय उपकरणे खरेदी केली जातील.

‘हा पैसा श्वसन यंत्र आणि इतर वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी वापरला जाईल’, असे जोकोविचने सर्बियाच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. 17 वेळा ग्रँड स्लॅम विजेता जोकोविच सध्या स्पेनच्या मार्बेल्ला येथे अडकला आहे. ‘मला माझ्या देशात आणि जगभरातील सर्व वैद्यकीय कर्मचार्‍यांचे आभार मानायचे आहेत जे कोरोनाव्हायरस विरूद्ध लढ्यात लोकांना मदत करीत आहेत’, असेही जोकोविचने सांगितले.

सर्बियामध्ये आतापर्यंत सात मृत्यूची नोंद झाली असून आणि 450हून अधिक जणांना या व्हायरसची बाधा झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.