मेलबर्न - ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेच्या ११ दिवशी महिला एकेरीत उलटफेर पाहायला मिळाला. उपांत्य फेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या अॅश्ले बार्टीला पराभवाचा धक्का बसला. जागतिक क्रमवारीत २१ व्या स्थानी असलेल्या अमेरिकेच्या सोफिया केनिनने बार्टीला ७-६, ७-५ अशी धूळ चारली. या पराभवाबरोबर बार्टीचे २०२० या वर्षातील पहिले ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न धूळीस मिळाले आहे.
ऑस्ट्रेलियाची अॅश्ले बार्टी आणि सोफिया केनिन यांच्यात १ तास ४५ मिनिटे लढत रंगली. यात सोफियाने पहिला सेट ट्रायब्रेकरमध्ये ७-६ असा जिंकला. बार्टी दुसऱ्या सेटमध्ये उलटफेर करेल, अशी आशा होती. पण, सोफियाच्या आक्रमक खेळासमोर ती हतबल ठरली. दुसरा सेट सोफियाने ७-५ असा जिंकत अंतिम फेरीत धडक मारली. सोफियाने पहिल्यादांच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
-
Clutch Kenin@SofiaKenin collects a 7-6(6) 7-5 win over world No. 1 Barty to reach her first Grand Slam final and become the youngest Melbourne finalist since 2008.#AO2020 | #AusOpen pic.twitter.com/vPxrtFzgZU
— #AusOpen (@AustralianOpen) January 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Clutch Kenin@SofiaKenin collects a 7-6(6) 7-5 win over world No. 1 Barty to reach her first Grand Slam final and become the youngest Melbourne finalist since 2008.#AO2020 | #AusOpen pic.twitter.com/vPxrtFzgZU
— #AusOpen (@AustralianOpen) January 30, 2020Clutch Kenin@SofiaKenin collects a 7-6(6) 7-5 win over world No. 1 Barty to reach her first Grand Slam final and become the youngest Melbourne finalist since 2008.#AO2020 | #AusOpen pic.twitter.com/vPxrtFzgZU
— #AusOpen (@AustralianOpen) January 30, 2020
दरम्यान, अॅश्ले बार्टीने २०१९ मध्ये एकमात्र ग्रँडस्लॅम फ्रेंच ओपनच्या रुपाने जिंकला आहे. याआधी २०१९ मध्ये बार्टी ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली होती. केनिनने उपांत्यपूर्व फेरीत ट्यूनेशेयाच्या ओन्स जबेऊरचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती. अंतिम सामन्यात ती गरबाइन मुगुरूजा आणि सिमोना हॉलेप यांच्यातील विजेत्याशी झुंजणार आहे.
हेही वाचा - Australian Open : संघर्षपूर्ण लढतीत राफेल नदालचा पराभव
हेही वाचा - ऑस्ट्रेलियन ओपन : रोमानियन टेनिसपटू सिमोना हॅलेप उपांत्य फेरीत