ETV Bharat / sports

कोरोनामुळे चीनमधील यंदाच्या सर्व टेनिस स्पर्धा रद्द - china tennis latest news

एटीपीने म्हटले आहे, की शांघाय मास्टर्स व्यतिरिक्त चीन ओपन, चेंगदू ओपन आणि झुहाई चॅम्पियनशिप देखील यंदा होणार नाहीत. रद्द करण्यात आलेल्या डब्ल्यूटीएच्या सात स्पर्धांमध्ये चीन ओपन, वुहान ओपन, जिआन्सी ओपन, झेंझोऊ ओपन, एलिट ट्रॉफी आणि ग्वांग्झोऊ ओपन यांचा समावेश आहे.

atp and wta cancel all tennis tournaments in china
कोरोनामुळे चीनमधील यंदाच्या सर्व टेनिस स्पर्धा रद्द
author img

By

Published : Jul 24, 2020, 4:35 PM IST

न्यूयॉर्क - यावर्षीच्या शांघाय मास्टर्स आणि चीनमधील डब्ल्यूटीए फायनल्ससह सर्व टेनिस स्पर्धा कोरोनाव्हायरसमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. एटीपी, डब्ल्यूटीए यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. चीनमध्ये क्रीडा प्रशासनाच्या वक्तव्यानंतर एटीपी, डब्ल्यूटीएने हा निर्णय घेतला असून यावर्षी देशात कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार नाही, असे प्रशासनाने म्हटले आहे.

एटीपीने म्हटले आहे, की शांघाय मास्टर्स व्यतिरिक्त चीन ओपन, चेंगदू ओपन आणि झुहाई चॅम्पियनशिप देखील यंदा होणार नाहीत. रद्द करण्यात आलेल्या डब्ल्यूटीएच्या सात स्पर्धांमध्ये चीन ओपन, वुहान ओपन, जिआन्सी ओपन, झेंझोऊ ओपन, एलिट ट्रॉफी आणि ग्वांग्झोऊ ओपन यांचा समावेश आहे.

डब्ल्यूटीएचे अध्यक्ष स्टीव्ह सिमोन म्हणाले, "चीनमध्ये जागतिक स्तरावरील स्पर्धा यावर्षी होणार नाहीत, याची आम्हाला खंत आहे. आम्ही या निर्णयाचा आदर करतो आणि पुढील हंगामात चीनमध्ये आम्ही परत जाण्यास उत्सुक आहोत."

एटीपी प्रमुख अँड्रिया गाउडेंजी म्हणाले, "आम्ही या साथीच्या वेळी स्थानिक संयोजकांचे ऐकत आहोत. आम्ही चीन सरकारच्या निर्णयाचा आदर करतो.'' 3 ऑगस्टपासून इटलीच्या पालेरेमो येथील स्पर्धेद्वारे डब्ल्यूटीएचे पुनरागमन होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.