टी-२० विश्वकरडंक स्पर्धेत मोठ्या फॉर्मात खेळणाऱ्या पाकिस्तानने चौथ्या विजयाची नोंद करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. बाबरसेनेने नवख्या नामिबियाला ४५ धावांनी गारद केले. अबुधाबीच्या शेख झायेद मैदानावर पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्पर्धेतील यशस्वी सलामी जोडी बाबर आणि मोहम्मद रिझवान यांनी पुन्हा एकदा जबरदस्त सुरुवात केली होती. बाबरच्या ७० तर रिझवानच्या नाबाद ७९ धावांमुळे पाकिस्तानने २० षटकात २ बाद १८९ धावा केल्या. प्रत्युत्तरात डेव्हिड वीज आणि क्रेग विल्यम्स यांनी झुंज दिली, पण ती अपुरी पडली. २० षटकात नामिबियाला ५ बाद १४४ धावांपर्यंतच पोहोचता आले. रिझवानला सामनावीर पुरस्कार मिळाला.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमाँ, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली , शादाब खान, इमाद वसीम, हसन अली , हॅरिस रौफ, शाहीद आफ्रिदी
नामिबिया प्लेइंग इलेव्हन
स्टीफन बार्ड, मायकेल व्हॅन लिंजेन, क्रेग विल्यम्स, गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), जॅन निकोल लोफ्टी-ईटन, झेन ग्रीन (डब्ल्यू), डेव्हिड विसे, जेजे स्मित, जॅन फ्रायलिंक, रुबेन ट्रम्पेलमन, बेन शिकोंगो
हेही वाचा - T20 Wc Sa Vs Ban :द. आफ्रिकेचा बांगलादेशवर 6 गडी राखून दणदणीत विजय