नवी दिल्ली : कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा कुस्ती महासंघाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. कुस्तीपटूंनी आपल्यावर अन्याय होत असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकारे धक्काबुक्की आणि त्रास दिल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला आहे. दुसरीकडे, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही ट्विट करून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे की, भारतीय कुस्तीपटू त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत आणि या देशात ते त्यांच्या हक्कांसाठी लढत राहतील. तसेच त्यांचे अन्न- पाणी बंद केले जात आहे, हे आश्चर्यकारक आहे.
-
जिन्होंने विदेशी सरज़मी पर बढ़ाई तिरंगे की शान, आज क्यों हो रहा है उनका ऐसा अपमान ? pic.twitter.com/1X6hGdRP46
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) April 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">जिन्होंने विदेशी सरज़मी पर बढ़ाई तिरंगे की शान, आज क्यों हो रहा है उनका ऐसा अपमान ? pic.twitter.com/1X6hGdRP46
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) April 24, 2023जिन्होंने विदेशी सरज़मी पर बढ़ाई तिरंगे की शान, आज क्यों हो रहा है उनका ऐसा अपमान ? pic.twitter.com/1X6hGdRP46
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) April 24, 2023
कुस्तीपटूंनी पत्रकार परिषद घेतली : सर्व पैलवान जंतरमंतर येथे रात्रभर मुक्कामी असल्याचेही समोर आले असून पोलिसांनी येथून एकाही पैलवानाला उचलले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस गुन्हा दाखल करू शकतात. दुसरीकडे, रविवारी सायंकाळी चार वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत विनेश फोगट, साक्षी आणि बजरंग पुनिया यांनी कुस्ती महासंघाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत न्याय मिळेपर्यंत जंतरमंतरवरच राहणार असल्याचे जाहीर केले. संध्याकाळी उशिरा कुस्तीपटूंनी पत्रकार परिषद घेतली. रात्री उशिरापर्यंत कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर मुक्काम केला.
-
Podium से फुटपाथ तक।
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) April 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
आधी रात खुले आसमान के नीचे न्याय की आस में। pic.twitter.com/rgaVTM5WGK
">Podium से फुटपाथ तक।
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) April 23, 2023
आधी रात खुले आसमान के नीचे न्याय की आस में। pic.twitter.com/rgaVTM5WGKPodium से फुटपाथ तक।
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) April 23, 2023
आधी रात खुले आसमान के नीचे न्याय की आस में। pic.twitter.com/rgaVTM5WGK
सात मुलींनी शोषणाच्या तक्रारी दिल्या आहेत : तीन महिन्यांपूर्वी महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी शोषणाचा आरोप केला होता. या आरोपांवर पुढील कारवाई होत नसल्याचे पाहून कुस्तीप्रेमींनी रविवारी पुन्हा एकदा मोर्चाला सुरूवात केली आहे. कुस्तीपटू जंतरमंतरवर धरणे धरून बसले आहेत. तत्पूर्वी दुपारी 4 वाजता त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना अद्याप आपल्याला न्याय मिळाला नसल्याचे सांगितले. सात मुलींनी शोषणाच्या तक्रारी दिल्या आहेत, मात्र त्यांच्या तक्रारींच्या आधारे अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. डब्ल्यूएफआय प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अटकेची मागणी करत कुस्तीपटूंनी दिल्ली जंतर-मंतर येथे आंदोलन सुरूच ठेवले.