चरखी दादरी - भारताची महिला कुस्तीपटू आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर फोगाट यांची मुलगी बबिता फोगाट विवेक सुहागसोबत विवाहबंधनात अडकली. रविवारी दादरीच्या बाबली गावात हा विवाह संपन्न झाला.
हेही वाचा - आगामी विश्वकरंडक स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा, अंधेरीच्या क्रिकेटपटूची संघात 'एन्ट्री'
या लग्नाचे प्रमुखे आकर्षण म्हणजे बबिता आणि विवेकने सात ऐवजी आठ फेरे घेतले. ही आठवी फेरी बेटी बचाओ, बेटी पढाओ यासह हुंडा दुष्कर्म विरोधात होती. बबिताची मोठी बहीण गीता फोगाटनेही आठ फेरे घेतले होते. हरियाणाच्या रीती-परंपरामध्ये हे लग्न पार पडले. अत्यंत थाटामाटात पार पडलेल्या या लग्नात डिजेचा वापर टाळण्यात आला होता.
सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर बबिता आणि विवेकने एकत्र मिळून वृक्षारोपणही केले. या नवविवाहित जोडप्याने महावीर फोगाट यांच्या आखाड्याजवळ रोपटे लावले. 'कुस्तीपटू होण्यासाठी स्वच्छ वातावरणाची देखील गरज आहे, जर झाडे असतील तर पर्यावरण आणखी चांगले होईल', असे बबिताने म्हटले आहे.
आज २ डिसेंबरला दिल्लीत बबिता आणि विवेकचे रिसेप्शन होणार आहे. या समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासह सिनेस्टार आणि अन्य कुस्तीपटूरही रिसेप्शनला या हजेरी लावणार आहेत.