नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स या तीन संघांनी महिला प्रीमियर लीग २०२३ च्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. या लीगमध्ये मंगळवार 21 मार्च रोजी होणारा सामना खूपच रोमांचक होऊ शकतो. या स्पर्धेतील 20 वा सामना आज ब्रेबॉर्न स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. 20 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 9 गडी राखून पराभव केला. आजच्या सामन्यातही दिल्ली कॅपिटल्स आपला ताबा प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून मैदानात उतरणार आहे. यासह यूपी वॉरियर्सने यापूर्वी गुजरात जायंट्सचा तीन विकेट्स राखून शानदार पराभव केला होता.
या संघाचा प्रवास थांबणार : दिल्ली कॅपिटल्स संघाने WPL मध्ये आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत, त्यापैकी 5 सामने जिंकले आहेत. मुंबई इंडियन्सने या लीगमध्ये 7 सामने खेळले असून, त्यापैकी 5 सामने त्यांनी जिंकले आहेत. याशिवाय यूपी वॉरियर्सने आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांपैकी 4 सामने जिंकले आहेत. यासह या तिन्ही संघांना प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्यात यश आले आहे. त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 7 सामन्यांपैकी केवळ 2 सामने जिंकले आहेत. याशिवाय गुजरात जायंट्सलाही 8 सामन्यांपैकी केवळ 2 सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांचा प्रवास साखळी सामन्यांसह संपला आहे.
गुणतालिकेत हे संघ अग्रस्थानी : पॉइंट टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स पहिल्या क्रमांकावर, मुंबई इंडियन्स दुसऱ्या क्रमांकावर आणि यूपी वॉरियर्स संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. 20 मार्च रोजी झालेल्या सामन्यात यूपी वॉरियर्सने गुजरात जायंट्सचा पराभव करीत प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये यूपी वॉरियर्सचा रनरेट 0.063 आहे. दुसरीकडे, जर आपण नेट रनरेटबद्दल बोललो, तर मुंबई इंडियन्सचा 1.725 आणि दिल्ली कॅपिटल्सचा 1.978 आहे.
कालच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा शानदार विजय : महिला प्रीमियर लीग 2023 चा 18 वा सामना काल मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सच्या संघावर दणदणीत विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने दिलेले 110 धावांचे माफक लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सने 9 षटकांत 1 गडी गमावून पूर्ण केले.
हेही वाचा : WPL 2023 : मुंबई इंडियन्सचा लाजिरवाणा पराभव, दिल्लीची गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप