बुडापेस्ट (हंगेरी) : बुडापेस्ट येथे जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ सुरू आहे. रविवारी (२७ ऑगस्ट) झालेल्या ३००० मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत भारताच्या पारुल चौधरीनं ११वं स्थान पटकावलं. पारुलनं ९:१५.३१ अशी वेळ नोंदवत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला. या कामगिरीसह तिनं २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी आपला प्रवेश निश्चित केलायं.
अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी केवळ दुसरी भारतीय महिला : ब्रुनेईच्या विन्फ्रेड मुटाइल यावीनं ८:५४.२९ या वेळेसह सुवर्णपदक जिंकलं. केनियाच्या बीट्रिस चेपकोनं ८:५८.९८ या तिच्या सर्वोत्तम वेळेसह रौप्य आणि केनियाच्याच फेथ चेरोटिचनं ९:००.६९ अशी वेळ नोंदवत कांस्यपदक जिंकलं. पारुल चौधरीने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचून आधीच इतिहास रचला होता. या स्पर्धेच्या ट्रॅक इव्हेंटच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी ती केवळ दुसरी भारतीय महिला खेळाडू होती.
-
World Athletics Championship 2023 | India's Parul Chaudhary comes 11th in Women's 3000 metre Steeplechase.
— ANI (@ANI) August 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(File pic) pic.twitter.com/0AxPtPmA2f
">World Athletics Championship 2023 | India's Parul Chaudhary comes 11th in Women's 3000 metre Steeplechase.
— ANI (@ANI) August 27, 2023
(File pic) pic.twitter.com/0AxPtPmA2fWorld Athletics Championship 2023 | India's Parul Chaudhary comes 11th in Women's 3000 metre Steeplechase.
— ANI (@ANI) August 27, 2023
(File pic) pic.twitter.com/0AxPtPmA2f
४x४०० मीटर रिले शर्यतीत भारत पाचव्या स्थानी : दुसरीकडे, जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ मधील ४x४०० मीटर रिले शर्यतीच्या अंतिम फेरीत भारतीय पुरुषांचा संघ पाचव्या स्थानावर राहिला. मोहम्मद अनस याहिया, अमोज जेकब, मुहम्मद अजमल आणि राजेश रमेश यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने २:५९.९२ अशी वेळ नोंदवली. क्विन्सी हॉल, व्हर्नन नॉरवुड, जस्टिन रॉबिन्सन आणि राय बेंजामिनवॉन यांच्या अमेरिकेच्या संघाने २:५७.३१ वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. फ्रान्सनं २:५८.४५ वेळेसह रौप्य तर ग्रेट ब्रिटननं २:५८.७१ वेळ नोंदवत कांस्यपदक जिंकलं.
-
World Athletics Championship 2023 | India finishes 5th in 4X400m Men's Relay Race; Indian quartet of Athletes Muhammed Anas Yahiya, Amoj Jacob, Muhammed Ajmal Variyathodi & Rajesh Ramesh finishes race in 2:59.92 seconds.
— ANI (@ANI) August 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(File pic) pic.twitter.com/QGrn0mSgvn
">World Athletics Championship 2023 | India finishes 5th in 4X400m Men's Relay Race; Indian quartet of Athletes Muhammed Anas Yahiya, Amoj Jacob, Muhammed Ajmal Variyathodi & Rajesh Ramesh finishes race in 2:59.92 seconds.
— ANI (@ANI) August 27, 2023
(File pic) pic.twitter.com/QGrn0mSgvnWorld Athletics Championship 2023 | India finishes 5th in 4X400m Men's Relay Race; Indian quartet of Athletes Muhammed Anas Yahiya, Amoj Jacob, Muhammed Ajmal Variyathodi & Rajesh Ramesh finishes race in 2:59.92 seconds.
— ANI (@ANI) August 27, 2023
(File pic) pic.twitter.com/QGrn0mSgvn
रिले संघाची ऐतिहासिक कामगिरी : पात्रता शर्यतीत भारतीय रिले संघानं आशियाई विक्रम मोडत नवा रेकॉर्ड स्थापित केला होता. या आधी आशियाई विक्रम २ मिनिटे ५९.५१ सेकंदाचा होता. हा विक्रम जपानी संघाच्या नावावर होता. भारताच्या चौकडीने २:५९.०५ अशी वेळ नोंदवत हा विक्रम मोडीत काढला. तुम्ही जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप सामन्यांचं थेट प्रक्षेपण Sports18 चॅनल वर पाहू शकता. याशिवाय मोबाईलवर Jio Cinema अॅप द्वारे तुम्ही या इव्हेंटचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.
हे ही वाचा :