नवी दिल्ली - भारताची माजी विश्वविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानूने ऑलिम्पिक पात्रता क्रमवारीत आठवे स्थान कायम राखले. गुरुवारी आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनने जाहीर केलेल्या क्रमवारीत ४९ किलो वजनी गटात भाग घेणारी चानू २९६६.६४०६ गुणांसह आठव्या स्थानावर आहे.
हेही वाचा - पहिली धाव काढताच प्रेक्षकांनी वाजवल्या टाळ्या, वाचा स्मिथने नक्की केले तरी काय?
टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी कोणत्याही वेटलिफ्टरने नोव्हेंबर २०१८ ते एप्रिल २०२० या सहा महिन्यांच्या तीन हंगामातील प्रत्येकी किमान एका कार्यक्रमात भाग घेतला पाहिजे. गेल्या वर्षी झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये चानूने एकूण १९९ किलो वजन उचलले. त्यावेळी तिचे अगदी कमी फरकाने कांस्यपदक हुकले होते.
त्यानंतर सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत चानूने २०१ किलो वजन उचलले. याशिवाय कतार आंतरराष्ट्रीय चषक स्पर्धेतही तिने सुवर्णपदक जिंकले. ऑलिम्पिक पात्रता रौप्य इव्हेंटसाठी ही स्पर्धा आहे.