भोपाळ - महाराष्ट्राचा जलतरणपट्टू वीरधवल खाडेने राष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपलाच विक्रम मोडित काढला आहे. ५० मीटर फ्री स्टाईल रेस प्रकारात त्याने २२.४४ सेकंदाची वेळ नोंदवत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मध्यप्रदेश येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशीप स्पर्धेत वीरधवलने हा पराक्रम केला.
हेही वाचा - लागोपाठ सहा वेळा शून्यावर राहिला, आणि लाजीरवाणा विक्रम नावावर केला
या विक्रमाअगोदर त्याने मागील वर्षी २२.४७ सेकंदाची वेळ नोंदवली होती. वीरधवलने 'ईटीव्ही भारत'शी खास चर्चा केली. तेव्हा तो म्हणाला, 'वरिष्ठ खेळाडूंसाठी भारतात एकच इवेंट होतो. मात्र असे ५-६ इवेंट झाले पाहिजेत.' तो सध्या २४ सप्टेंबरला होणाऱ्या आशियाई एज ग्रुप स्पर्धेसाठी तयारी करत आहे. या स्पर्धेमध्ये तो जास्तीत जास्त पदके मिळवण्यासाठी उत्सुक आहे.
दुसरीकडे महाराष्ट्राच्या महिला संघाने ४×१०० मीटर फ्री स्टाइलमध्ये ४.०२.९० अशी वेळ नोंदवत नवीन विक्रम केला आहे. पुरुष वर्गाच्या २०० मीटर बॅक स्ट्रोकमध्ये अरविंद मनी तामिळनाडूचा सेतू, दिल्लीचा अनुराग, कर्नाटकचा शिवा, मध्यप्रदेशचा नानक मूलचंदानी यांचा समावेश आहे. तर, महिलांच्या २०० मीटर बॅक स्ट्रोकमध्ये महाराष्ट्राची युगा अंतिम फेरीत दाखल झाली आहे. तर, रिझर्व्ह प्रकारात साधवीने स्थान मिळवले आहे.