ETV Bharat / sports

Tokyo Paralympics: जय हो! प्रमोद भगतने जिंकलं सुवर्ण पदक, मनोज सरकार कास्य पदकाचा मानकरी

भारतीय प्रमोद भगतने टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन खेळात सुवर्ण पदक जिंकले. तर मनोज सरकार कास्य पदकाचा मानकरी ठरला. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 17 पदके जिंकली आहेत.

Tokyo Paralympics: pramod-bhagat-wins-gold-medal-and-manoj-sarkar-bags-bronze-medal-in-badminton-at Tokyo paralympics
Tokyo Paralympics: जय हो! प्रमोद भगतने जिंकलं सुवर्ण पदक, मनोज सरकार कास्य पदकाचा मानकरी
author img

By

Published : Sep 4, 2021, 4:55 PM IST

Updated : Sep 4, 2021, 5:12 PM IST

टोकियो - भारतीय पॅरा बॅडमिंटनपटूंनी टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये शानदार कामगिरी केली. भारताचा स्टार पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने सुवर्ण पदक जिंकले. तर मनोज सरकार कास्य पदकाचा मानकरी ठरला. दरम्यान, यंदाच्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत प्रथमच बॅडमिंटन खेळाचा समावेश करण्यात आला आहे.

प्रमोद भगतचा अंतिम सामन्यात ब्रिटनच्या डेनियल बेथेल याच्याशी सामना झाला. हा सामना भगतने 21-14, 21-17 अशा फरकाने जिंकत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. भारताचे टोकियो पॅराऑलिम्पिकमधील हे चौथे सुवर्ण पदक ठरले.

असा जिंकला सामना

जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी आणि आशियाई चॅम्पियन प्रमोद भगत याने एसएल 3 गटात जपानच्या दाइसुके फुजीहारा याचा 21-11, 21-16 अशा फरकाने पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत त्याच्यासमोर डेनियल बेथेल आव्हान होते. भगतने अंतिम सामन्यातील पहिला गेम 21-14 असा जिंकत आपले मनसुबे जाहीर केले. परंतु दुसऱ्या गेममध्ये ब्रिटनच्या खेळाडूने जोरदार पुनरागमनाचा प्रयत्न केला.

डेनियलने दुसऱ्या गेममध्ये 11-4 अशी आघाडी घेतली. तेव्हा प्रमोद भगत याने आपला अनुभव पणाला लावत डेनियलला चांगलेच झुंजवले. त्याने पिछाडीनंतर दमदार खेळ करत दुसरा गेम 21-17 अशा फरकाने जिंकला आणि यासह सुवर्ण पदकावर नाव कोरलं. दरम्यान प्रमोद भगतने विश्व चॅम्पियनशीप स्पर्धेत चार सुवर्ण पदकासह 45 आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत.

मनोज सरकार कास्य पदकाचा मानकरी

मनोज सरकारचा उपांत्य फेरीत पराभव झाला. तेव्हा त्याला कास्य पदकासाठी सामना खेळण्याची संधी मिळाली. त्याने बॅडमिंटनच्या एसएल 3 गटामध्ये जपानच्या फुजीहाराचा 22-20, 21-13 असा फरकाने पराभव करत कास्य पदकला गवसणी घातली.

दरम्यान, भारताने टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये या पदकांसह एकूण 17 पदके जिंकली. यात 4 सुवर्ण, 7 रौप्य आणि 6 कास्य पदकांचा समावेश आहे.

हेही वाचा - टोकियो पॅरालिम्पिक : नेमबाजीत मनिष नरवालने सुवर्ण तर सिंहराजने रौप्य पदक पटकावले

हेही वाचा - Tokyo Paralympics : पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनव बिंद्रा आणि विरेंद्र सेहवाग यांनी पॅरा नेमबाजांचे केलं कौतुक

Last Updated : Sep 4, 2021, 5:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.