टोकियो - प्रमोद भगत आणि पलक कोहली या भारतीय मिश्र दुहेरी जोडीला टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला. बॅडमिंटन खेळाच्या ग्रुप बी मध्ये फ्रान्सच्या लुकास माजूर आणि फॉस्टीस नोएल या दुसऱ्या मानांकित जोडीने भारतीय जोडीचा पराभव केला.
प्रमोद भगत आणि पलक कोहली एसएल3-एसयू 5 वर्गात खेळत होते. त्यांना फ्रान्सच्या जोडीकडून 43 मिनिटात 9-21 21-15 19-21 अशा फरकाने पराभूत व्हावे लागले.
भारतीय जोडीने सामन्यात खराब सुरूवात केली. पहिल्या ब्रेकपर्यंत भारतीय जोडी 5-11 अशा पिछाडीवर होती. अखेरपर्यंत हाच दबदबा राखत फ्रान्सच्या जोडीने हा गेम सहज जिंकला. तेव्हा भारतीय जोडीने दुसऱ्या गेममध्ये जोरदार पुनरागमन केले आणि हा गेम 21-15 अशा फरकाने जिंकत सामना बरोबरीत आणला.
तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये फ्रान्सच्या जोडीने 13-9 अशी बढत घेतली होती. तेव्हा भगत-पलक जोडीने शानदार वापसी करत हा गेम 15-14 अशा स्थितीत आणला. त्यानंतर फ्रान्सच्या जोडीने आपला अनुभव पणाला लावत मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत तिसरा गेम 21-19 अशा फरकाने जिंकत सामना आपल्या नावे केला.
सिंघराज अदानाने शुटिंगमध्ये जिंकलं कास्य पदक
टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेच्या शुटिंग खेळात भारताचा सिंघराज अदाना याने कास्य पदक जिंकले. त्याने पुरूष 10 मीटर एअर पिस्तूल एसएच1च्या अंतिम फेरीत तिसरे स्थान पटकावले. हरियाणाच्या या पॅरा शूटरने 216.8 पाँईट घेत भारताला कास्य पदक जिंकून दिले. चीनच्या यांग चाओ याने 237.9 अशी कामगिरी करत सुवर्ण पदक जिंकले. तर चीनचा हुआंग जिंग 237.5 पाँईट्ससह रौप्य पदकाचा विजेता ठरला.
हेही वाचा - Tokyo Paralympics : उंच उडीत मरियप्पन थंगवेलूने रौप्य आणि शरद कुमारने जिंकलं कास्य पदक
हेही वाचा - Tokyo Paralympics : भारताच्या सिंघराज अदानाने शुटिंगमध्ये जिंकलं कास्य पदक