ETV Bharat / sports

Tokyo Paralympics: मनिष, सिंगराज अंतिम फेरीत; भारताच्या पदकाच्या आशा वाढल्या - टोकियो पॅराऑलिम्पिक

भारतीय नेमबाज मनिष नरवाल आणि सिंगराज अदाना हे पुरूष 10 मीटर एअर पिस्तूल एसएच1 गटाच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

Tokyo Paralympics: Manish, Singhraj storm into medal round of 10m Air Pistol SH1
Tokyo Paralympics: मनिष, सिंगराज अंतिम फेरीत, भारताच्या पदकाच्या आशा वाढल्या
author img

By

Published : Aug 31, 2021, 5:03 PM IST

टोकियो - भारतीय नेमबाजांनी टोकियो पॅराऑलिम्पिकच्या सातव्या दिवशी दमदार कामगिरी केली. भारतीय नेमबाज मनिष नरवाल आणि सिंगराज अदाना हे पुरूष 10 मीटर एअर पिस्तूल एसएच1 गटाच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरले.

मनिष नरवाल याने 60 शॉटवर 9.583 च्या सरासरीने 575 -21x गुण मिळवले. तो पात्रता फेरीत पहिल्या स्थानावर होता. त्याने चीनच्या शियाओलोंग लू याला मागे टाकले. चीनचा खेळाडू 575 -15x गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिला. भारताचा दुसरा नेमबाज सिंगराज अदाना याने 569 -18x गुणांसह सहावे स्थान पटाकावले.

भारताचा आणखी एक नेमबाज दिप्रेंद्र सिंहला अंतिम फेरी गाठता आली नाही. तो 560 -9x गुणांसह 10व्या स्थानावर राहिला. त्याने सहा सिरिजमध्ये अनुक्रमे 96, 93, 96, 88, 92 आणि 95 असा स्कोर केला.

मनिष नरवाल याने सुरूवातीच्या दोन सिरीजमध्ये अनुक्रमे 96 आणि 95 गुण घेत जोरदार सुरूवात केली. तिसऱ्या सिरीजमध्ये तिची कामगिरी खराब ठरली. या सिरीजमध्ये त्याला 92 स्कोर करता आला. यात त्याने केवळ तीन वेळा परफेक्ट 10 चा शॉट मारला. तिसऱ्या सिरीजमधील अपयश त्याने पुढील सिरीजमध्ये धुवून काढले. त्याने चौथ्या सिरीजमध्ये 98 स्कोर केला. यानंतरच्या सिरीजमध्ये त्याने 97 आणि 97 गुण घेत अव्वल स्थान पटकावले.

सिंगराजने देखील चांगली सुरूवात केली. त्याने पहिल्या दोन सिरीजमध्ये 95 आणि 97 असे गुण घेतले. तर तिसऱ्या सिरीजमध्ये तो पिछाडीवर गेला. या सिरीजमध्ये त्याला 93 स्कोर करता आला. पण त्याने याची भरपाई पुढील सिरीजमध्ये केली आणि त्याने चौथ्या सिरीजमध्ये 95 गुण घेतले. यानंतर पाचव्या सिरीजमध्ये 92 तर अखेरच्या सहाव्या सिरीजमध्ये 97 स्कोर करत तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरला.

हेही वाचा - Tokyo Paralympics: भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा सुमित अंतिल काय म्हणाला?

हेही वाचा - Asian Youth Championship स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा डंका, युवा गटात जिंकले 6 सुवर्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.