टोकियो - भारतीय भालाफेकपटू सुमित अंतिलने टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले. या कामगिरीनंतर त्याच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे सुमित अंतिलने पाच वेळा विश्वविक्रम मोडत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. सुवर्ण पदक जिंकल्यानंतर बोलताना सुमित अंतिलने, हे माझे बेस्ट प्रदर्शन नव्हते. मी याहून अधिक चांगली कामगिरी करून दाखवेन, असा विश्वास बोलून दाखवला.
हरियाणाच्या सोनीपतचा 23 वर्षीय सुमित अंतिलने पाचव्या प्रयत्नात 68.55 मीटर लांब भाला फेकत सुवर्ण पदक जिंकले. त्याने 62.88 मीटरचा आपलाच मागील विश्वविक्रम, पाच वेळा सुधारला.
-
#SumitAntil is the Champion, World Record Holder, #Tokyo2020 #Paralympics 🥇 #Gold Medallist #Javelin @ParaAthletics
— Paralympic India 🇮🇳 #Cheer4India 🏅 #Praise4Para (@ParalympicIndia) August 30, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Cheer4India #Praise4Para @narendramodi @ianuragthakur @IndiaSports @Media_SAI @ddsportschannel @TheLICForever @VedantaLimited @neerajkjha @EurosportIN pic.twitter.com/jWoM36Bj0l
">#SumitAntil is the Champion, World Record Holder, #Tokyo2020 #Paralympics 🥇 #Gold Medallist #Javelin @ParaAthletics
— Paralympic India 🇮🇳 #Cheer4India 🏅 #Praise4Para (@ParalympicIndia) August 30, 2021
Cheer4India #Praise4Para @narendramodi @ianuragthakur @IndiaSports @Media_SAI @ddsportschannel @TheLICForever @VedantaLimited @neerajkjha @EurosportIN pic.twitter.com/jWoM36Bj0l#SumitAntil is the Champion, World Record Holder, #Tokyo2020 #Paralympics 🥇 #Gold Medallist #Javelin @ParaAthletics
— Paralympic India 🇮🇳 #Cheer4India 🏅 #Praise4Para (@ParalympicIndia) August 30, 2021
Cheer4India #Praise4Para @narendramodi @ianuragthakur @IndiaSports @Media_SAI @ddsportschannel @TheLICForever @VedantaLimited @neerajkjha @EurosportIN pic.twitter.com/jWoM36Bj0l
सुमित अंतिल म्हणाला, हे माझे पहिले पॅराऑलिम्पिक होते. कठीण सामना असल्याने मी थोडासा नर्वस होतो. 70 मीटरहून अधिक लांब थ्रो जाईल, असा विचार मी करत होतो. कदाचित मी 75 मीटरचा देखील थ्रो करू शकलो असतो. ही माझी बेस्ट कामगिरी नाही. पण मी विश्वविक्रम मोडल्याने खूश आहे.
मोटारसायकल दुर्घटनेत सुमित अंतिलने आपला एक पाय गमावला आहे. तो पुढे बोलताना म्हणाला की, मी खूप चांगला कुस्तीपटू नव्हतो. माझे कुटुंब मला कुस्ती खेळताना पाहू इच्छित होते. मी वयाच्या सातव्या वर्षापासून कुस्ती खेळायला सुरूवात केली. जवळपास मी चार ते पाच वर्ष कुस्ती खेळलो. पण इतका चांगला कुस्तीपटू मी नव्हतो.
अपघातानानंतर माझे आयुष्य बदलले. 2015 मध्ये मी जेव्हा लोकांना भेटण्यासाठी स्टेडियममध्ये गेलो. तिथे मी पॅराअॅथलिटना पाहिलो. यातील काहींनी मला सांगितलं की, तुझी शरिरयष्टी चांगली आहे. तो पुढील पॅराऑलिम्पिक खेळू शकतोस. कोणाला कल्पना होती, मी चॅम्पियन बनेन. खरेच असे घडलं. हे एक स्वप्न सत्यात उतरण्यासारखं आहे. मला माझ्या भावना व्यक्त करता येत नाहीयेत, असे देखील सुमित अंतिल म्हणाला.
दरम्यान, टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाचा मिचाल बुरियन रौप्य पदकाचा मानकरी ठरला. त्याने 66.29 मीटर लांब भाला फेकला. तर श्रीलंकेचा डुलान कोडिथुवाक्कू याने 65.61 मीटर लांब भाला फेकत कास्य पदक जिंकले.
हेही वाचा - Tokyo Paralympics : मानलं रे पठ्ठ्या! विश्वविक्रमासह सुमित अंतिलने जिंकले सुवर्ण पदक
हेही वाचा - Tokyo Paralympics: सुमित अंतिलची 'सुवर्ण' कामगिरी, पंतप्रधान मोदींसह राहुल गांधींनी केलं अभिनंदन