ETV Bharat / sports

Tokyo Olympics: तिरंदाजीत अतनु दासचा अचूक लक्ष्य भेद; शूट ऑफमध्ये गोल्ड मेडलिस्टला चारली धूळ

भारताचा तिरंदाज अतनु दास याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचा पराभव केला.

Tokyo Olympics: Archer Atanu Das Beats 2012 Champion, Enters Pre-Quarterfinals
Tokyo Olympics: तिरंदाजीत अतनु दासचा अचूक लक्ष्य भेद; शूट ऑफमध्ये गोल्ड मेडलिस्टला चारली धूळ
author img

By

Published : Jul 29, 2021, 10:23 AM IST

टोकियो - भारताचा तिरंदाज अतनु दास याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचा पराभव केला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात अतनु दास याने दक्षिण कोरियाच्या ओ जिन्होक याचा पराभव केला. अतन दास याने हा सामना शूट ऑफमध्ये 6-5 अशा जिंकला. या विजयासह अतनु दास उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.

अतनु दास याने पहिला सेट २६-२५ ने गमावला. दुसऱ्या सेटमध्ये त्याने कोरियाच्या खेळाडूला कडवी झुंज दिली. दुसरा आणि तिसरा सेट २७-२७ अशा बरोबरीत सुटला. त्यानंतर चौथ्या सेटमध्ये अतनु दास याने बाजी मारली. त्याने हा सेट २७-२२ अशा फरकाने जिंकला. पाचवा सेट २८-२८ ने बरोबरीत सुटला आणि सामना शूट ऑफमध्ये गेला.

शूट ऑफचा थरार...

सामना शूट ऑफमध्ये गेल्यानंतर आता काय होणार याची धास्ती वाटत होती. तेव्हा ओ जिन्होकने शूट ऑफमध्ये 9 स्कोर केला. तेव्हा भारताच्या विजयाच्या आशा वाढल्या. अतनुने परफेक्ट 10 चा निशाणाला साधत सामन्यात बाजी मारली आणि कोरियन ओ जिन्होकचे सुवर्णपदक जिंकण्याचे मनसुबे उधळून लावले.

दरम्यान, त्याआधी अतनु दास याने टॉप ३२ फेरीत तैवानच्या डेंग यू चेंग याचा ६-४ ने पराभव केला होता. त्याने हा सामना २७-२६, २७-२८, २८-२६, २७-२८ आणि २८-२६ अशा फरकाने जिंकला होता.

हेही वाचा - Tokyo Olympics : पी. व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत; डेन्मार्कच्या मियाचा पाडला फाडशा

हेही वाचा - Tokyo Olympics: सुवर्णपदक विजेत्याचा धुव्वा उडवत भारतीय हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.