टोकियो - क्रीडा जगतातील सर्वात मोठा इव्हेंट टोकियो ऑलिम्पिकला सुरूवात होण्यासाठी काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा मागील वर्षी स्थगित करण्यात आली होती. या वर्षी ही स्पर्धा टोकियो ऑलिम्पिक 2020 या नावानेच होत आहे. याच्या नावात बदल करण्यात आलेला नाही. या मेगा इव्हेंटला उद्या शुक्रवारपासून जपानच्या इंटरनॅशनल स्टेडियममध्ये सुरूवात होणार आहे.
टोकियो ऑलिम्पिकचे आयोजक आणि आधिकारी जपानमधील वाढते कोरोना रुग्णांमुळे चिंतेत आहेत. परंतु नियोजित कार्यक्रमानुसारच इव्हेंट होणार आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये 206 देशातील 11 हजाराहून अधिक अॅथलेटिक्स 339 इव्हेंट्समध्ये भाग घेणार आहेत. या इव्हेंट्सचे आयोजन वेगवेगळ्या 42 ठिकाणी करण्यात आले आहे.
कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिक पाहण्यासाठी प्रेक्षकांना मैदानात येण्याची परवानगी नाही. या महिन्याच्या सुरूवातीला जपान सरकारने हा निर्णय घेतला आहे. जपान सरकारने हा निर्णय कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी घेतला आहे. याचा थेट परिणाम उद्धाटन सोहळ्यावर होणार झाला आहे.
टोकियो ऑलिम्पिकच्या उद्धाटन सोहळ्यात सर्व अॅथलेटिक्सपटूंना सहभागी होता येणार नाही. कमीत कमी अॅथलेटिक्ससह हा उद्धाटन सोहळा होणार आहे. आतापर्यंतच्या ऑलिम्पिक इतिहासात उद्धाटन सोहळ्यात सर्व खेळाडू सहभागी होत होते.
टोकियो ऑलिम्पिकचा उद्धाटन सोहळा कोठे आणि कधी सुरू होणार?
टोकियो ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा उद्या 23 जुलै रोजी टोकियोतील राष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे. या सोहळ्याला स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 8 वाजता सुरूवात होईल. तर भारतीय वेळेनुसार हा सोहळा 4 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
हेही वाचा - Tokyo Olympics मध्ये मेरी कोम, मनप्रीत सिंह भारताचे ध्वजवाहक
हेही वाचा - ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदके जिंकणाऱ्या खेळाडूंची संपूर्ण यादी, एका क्लिकवर