ETV Bharat / sports

LIVE Tokyo Olympics : भारतीय महिला हॉकी संघाचा सलग दुसरा पराभव, जर्मनीची 2-0 ने मात - Tokyo Olympics 2020 Day 4 Live

http://10.10.50.85:6060///finalout4/maharashtra-nle/finalout/26-July-2021/12573566_kk.jpg
LIVE Tokyo Olympics : साई प्रणीत, सूतीर्था मुखर्जी, भवानी देवी बाहेर; शरथ कमलकडून आशा
author img

By

Published : Jul 26, 2021, 9:10 AM IST

Updated : Jul 26, 2021, 7:52 PM IST

19:49 July 26

भारतीय महिला हॉकी संघाचा सलग दुसरा पराभव, जर्मनीची 2-0 ने मात

टोक्यो - भारतीय महिला हॉकी टीमला टोक्यो ओलंपिकमध्ये सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. आज भारतीय संघाला जर्मनीने 2-0 ने हरवले. रानी रामपालच्या नेतृत्वात टीमने चांगले प्रदर्शन केले मात्र त्यांना यश आले नाही. यापूर्वी भारतीय संघाला जगातील नंबर एकची टीम नेदरलँडकडून 1-5 ने पराभव सहन करावा लागला होता. 

16:19 July 26

जलतरणपटू साजन प्रकाशला उपांत्य फेरी गाठण्यास अपयश

भारताचा जलतरणपटू साजन प्रकाशला उपांत्य फेरी गाठण्यास अपयश आले. साजन प्रकाश 200 मीटर बटरफ्लाय हीट-2 मध्ये 1:57.22 वेळ घेत चौथ्या स्थानावर राहिला.  

15:47 July 26

बॉक्सर आशिषकुमारचा पराभव

बॉक्सिंग: ७५ किलो गटात चीनच्या एर्बिके तुओहेताने भारताच्या आशिषकुमारचा ५-० असा पराभव केला.

15:47 July 26

नेत्रा कुमानन 40व्या स्थानावर

सेलिंग - महिला लेजर रेडियल रेसमध्ये भारताची नेत्रा कुमानन रेस ३ मध्ये १५वे स्था मिळवले. पण रेस ४ मध्ये ती ४०व्या स्थानावर घसरली. 

15:46 July 26

विष्णू सर्वानन अपयशी

सेलिंग - पुरुष लेजर रेसमध्ये विष्णू सर्वानन रेस २ मध्ये २०व्या स्थानावर राहिला. तर रेस ३ मध्ये त्याला २४व्या स्थानावर समाधान मानावे लागले.  

13:56 July 26

मनिका बत्राचा तिसऱ्या फेरीत पराभव

टेबल टेनिस: महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत भारताच्या मनिका बत्राचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाच्या सोफिया पोलकानोवाने मनिकावर ४-० असा विजय मिळवला. 

12:08 July 26

टेनिसपटू सुमित नागलचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपूष्टात

टेनिस - सुमित नागलचा पुरूष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत पराभव झाला. रुस ऑलिम्पिक समितीच्या डेनिल मेदवेदेव याने नागलचा 6-2, 6-1 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.  

12:02 July 26

भारतीय नेमबाजांची सुमार कामगिरी; अंगद, मेराज बाहेर

नेमबाजी - भारताचे स्कीट शूटिंग खेळाडू अंगद वीर सिंह बाजवा आणि मेराज अहमद खान यांचा पात्रता फेरीच्या दुसऱ्या दिवशी पराभव झाला. अंगदने 120 गुणांसह 18 वे स्थान तर मेराजने 117 गुणांसह 25वा क्रमांक मिळवला. दरम्यान, यात टॉप 6 खेळाडू मुख्य फेरीसाठी पात्र ठरतात.  

10:42 July 26

तिरंदाजी - भारतीय पुरुष संघाचा कोरियाकडून दारूण पराभव

तिरंदाजी -  भारतीय पुरूष संघाचा प्रीसेमीफायनलमध्ये पराभव झाला. कोरियाच्या संघाने भारताचा ६-० असा पराभव केला.  

10:41 July 26

चिराग-सात्विकसाइराज जोडी पराभूत

बॅडमिंटन - भारतीय पुरूष जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाइराज रंकारेड्डी यांचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले. दुसऱ्या फेरीत भारतीय जोडीचा इंडोनेशियाच्या जोडीने 21-13, 21-12 असा पराभव केला.  

10:14 July 26

बॅडमिंटन - साई प्रणीतने केलं निराश

2019 विश्व चॅम्पियनशीपमधील कांस्य पदक विजेता साई प्रणीतला पुरूष एकेरीची नॉकआउट फेरी गाठण्यास अपयश आले. तो पहिल्याच सामन्यात पराभूत झाला. इज्राइलच्या मिशा जिल्बरमॅन याने त्याचे आव्हान संपवले.  

09:44 July 26

टेबल टेनिसपटू शरथ कमल तिसऱ्या फेरीत

टेबल टेनिस - भारताचा स्टार टेबल टेनिसपटू शरथ कमल याने पुरूष एकेरीत तिसरी फेरी गाठली आहे. त्याने पोर्तूगालच्या तियागो अपोलोनिया याचा 4-2 ने पराभव केला. शरथने हा सामना 49 मिनिटात 2-11, 11-8, 11-5, 9-11, 11-6, 11-9 असा जिंकला.  

09:39 July 26

तिरंदाजीत आज भारताच्या पदक जिंकण्याच्या आशा

भारताच्या आज पदक जिंकण्याच्या आशा वाढल्या आहेत. भारत तिरंदाजीत पदक जिंकू शकतो. भारतीय पुरूष संघाने आज आपल्या पहिल्या सामन्यात कझाकिस्तानचा 6-2 ने पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारताची गाठ दक्षिण कोरियाशी होणार आहे. हा सामना दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी होणार आहे.  

09:27 July 26

सूतीर्था मुखर्जीचे आव्हान संपूष्टात

टेबल टेनिस - भारतीय टेबल टेनिसपटू सूतीर्था मुखर्जीचा दुसऱ्या फेरीत पराभव झाला. पोर्तूगालच्या फू यू हिने मुखर्जीचा 4-0 असा एकतर्फा पराभव केला. संपूर्ण सामन्यावर फू यूने वर्चस्व राखले. फू यू हिने चार गेम 11-3, 11-3, 11-5, 11-5 असे सहज जिंकले.  

09:23 July 26

भारतीय नेमबाजांकडून निराशा

भारतीय नेमबाजांचे टोकियो ऑलिम्पिकमधील सुमार प्रदर्शन जारी आहे. स्किट क्वालिफिकेशनमध्ये अंगद वीर सिंह बाजवा क्वालिफिकेशन डे 1 च्या अखेरीस 11 व्या स्थानावर होता. पण चौथ्या फेरीत तो 19 व्या स्थानावर घसरला. दुसरीकडे मेराज अहमद खानने 23 गुणांसह सुरूवात केली होती. पण तो देखील अपयशी ठरला. दरम्यान, 30 नेमबाजांच्या यादीत टॉप6 खेळाडू फायनलसाठी पात्र ठरतात. अंगद आणि मेराज यासाठी पात्र ठरण्याची आशा जवळपास मावळली आहे. 

09:14 July 26

तलवारबाजी : भवानी देवीचा पराभव

भारतीय महिला तलवारबाज भवानी देवीला राउंड ३२ मध्ये पराभव पत्कारावा लागला. फ्रान्सच्या मनन ब्रुनेट हिने भवानी ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आणले. मननने हा सामना 17-7 असा जिंकला. दरम्यान, भवानीचे हा पहिला ऑलिम्पिक आहे.  

08:57 July 26

टोकियो - टोकियो ऑलिम्पिकचा आज चौथा दिवस आहे. या दिवशी भारतीय खेळाडू नेमबाज, तलवारबाज, तिरंदाजी, टेबल टेनिस, सेलिंग, बॅडमिंटन, टेनिस, हॉकीसह जलतरण स्पर्धेत भाग घेणार आहे. आजच्या दिवशी भारताला नेमबाजांकडून पदकाची आशा आहे. पहिल्या तीन दिवसात भारताला रायफल स्पर्धेत निराशाच मिळाली आहे. अशावेळी चौथ्या दिवशी काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

Last Updated : Jul 26, 2021, 7:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.