ETV Bharat / sports

Tokyo Olympics : आज दिवसभरातील भारतीय खेळाडूंच्या सामन्यांचे निकाल, एका क्लिकवर - टोकियो ऑलिम्पिक 2020 अपडेट

Tokyo Olympics 2020 July 31 Live updates

author img

By

Published : Jul 31, 2021, 9:02 AM IST

Updated : Jul 31, 2021, 5:13 PM IST

16:58 July 31

पी. व्ही. सिंधूचा धक्कादायक पराभव

बॅडमिंटन - पदकाची प्रबळ दावेदार पी. व्ही. सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव झाला. चीनी तैईपेच्या ताय झू यिंगने सिंधूचा 21-18, 21-12 असा पराभव केला. सिंधू आता कांस्य पदकासाठी सामना खेळेल. या सामन्यात तिच्यासमोर चीनच्या ही बिंग जिआओ हिचे आव्हान असणार आहे. 

15:10 July 31

पूजा राणीचे स्वप्न ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न धुळीस

बॉक्सिंगमध्ये भारताला जबर धक्का बसला. महिला बॉक्सर पूजा राणी उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली. 75 किलो वजनी गटात चीनच्या ली क्यूआन हिने पूजा राणीचा 5-0 ने पराभव केला. 

14:48 July 31

सेलिंगमध्ये भारतीय जोडीचे आव्हान संपुष्टात

सेलिंग - वरुण ठक्कर आणि गणपती या भारतीय जोडीचे टोकियोमधील आव्हान संपुष्टात आले. पुरूष स्कीफ रेसमध्ये भारतीय जोडी 17 व्या स्थानावर राहिली. दरम्यान, टॉप 10 जोड्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात.  

12:09 July 31

नेमबाजीत निराशा, अंजुम-तेजस्विनी अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयशी

नेमबाजी: महिला ५० मीटर रायफल थ्री पोजिशनमध्ये अंजुम मुद्गील आणि तेजस्विनी सावंत यांना अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयश आलं आहे.  

10:33 July 31

भारतीय महिला हॉकी संघाचा विजय

हॉकी - भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. भारताने हा सामना 4-3 ने जिंकला. या विजयासह भारतीय संघाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याच्या आशा कायम आहेत. 

09:07 July 31

कमलप्रीत कौर अंतिम फेरीत

अॅथलेटिक्स: महिला थाळीफेकमध्ये भारताची कमलप्रीत कौर अंतिम फेरीत पोहोचली आहे. पात्रता फेरीत कौरने दुसरे तर सीमा पुनियाने १६वे स्थान पटकावले. दरम्यान, पहिल्या १२ जणांना अंतिम फेरीत स्थान मिळतं.  

09:07 July 31

अमित पांघलचा पराभव

बॉक्सिंग - अमित पांघलचे उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला. 52 किलो वजनी गटात मार्टिनेझने पांघलचा 4-1 ने पराभव केला.  

09:07 July 31

अतनु दासचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात

तिरंदाजी : अतनु दासचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. जपानच्या ताकाहारूने रोमहर्षक सामन्यात अतनुचा पराभव केला.  

08:53 July 31

टोकियो - टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा आज 9 वा दिवस आहे. आज भारतीय खेळाडू तिरंदाज, नेमबाजी, बॉक्सिंग, बॅडमिंटन, सेलिंग, डिस्कस थ्रो म्हणजे थाळीफेकमध्ये नशीब आजमावणार आहेत. याशिवाय भारतीय हॉकी संघाचा सामना देखील आज होणार आहे. 

Last Updated : Jul 31, 2021, 5:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.