टोकियो - जमैकाच्या इलैने थॉम्पसन-हेरा हिने आपल्याच देशाच्या शैली एन फ्रेजर हिचा पराभव करत महिला 100 मीटर धावण्याची स्पर्धा जिंकली. तिने 100 मीटरचे अंतर 10.61 सेंकदात कापले. शैली 10.74 सेकंदाच्या वेळेसह दुसरी आली. यादरम्यान, थॉम्पसन हिने फ्रान्सची ग्रिफिथ जॉयनेर हिचा 33 वर्षीय रेकॉर्ड मोडीत काढला.
1988 ऑलिम्पिकमध्ये ग्रिफिथ जॉयफेर हिने 10.62 इतका वेळ घेत विक्रम नोंदवला होता. तिचा हा विक्रम थॉम्पसन हिने मोडला. पण थॉम्पसन जॉयनेर हिचा विश्वविक्रम मोडू शकली नाही. जॉयनेरने 100 मीटरचे अंतर 10.49 सेकंदात पूर्ण केलं होतं. तिचा हा विश्वविक्रम अद्याप आबाधित आहे. जॉयनेर नंतर थॉम्पसन सर्वाधिक वेगवान महिला धावपटू ठरली.
100 मीटर धावण्याच्या शर्यतीत जमैकाच्या शेरिका जॅकसन (10.76) कांस्य पदकाची विजेती ठरली. बिजिंग ऑलिम्पिक 2008 नंतर पहिल्यादाच जमैकाच्या खेळाडूंनी एका प्रकारात निर्विवादीत यश मिळवलं.
रिले मध्ये पोलंडची बाजी
महिला 4x400 मीटर रिले शर्यतीत पोलंडच्या संघाने सुवर्ण पदक जिंकला. विशेष म्हणजे पोलंडचा संघ या प्रकारात प्रथमच सहभागी झाला होता. या प्रकारात अमेरिकेने रौप्य पदक आणि डोमिनिक गणराज्य संघाने कांस्य पदक जिंकलं.
थाळीफेकमध्ये स्वीडनची बाजी
थाळीफेकमध्ये स्वीडनच्या डेनियल स्टाल (68.90) याने सुवर्ण पदक जिंकलं. तर सायमन पेटर्सन (67.39) रौप्य तर ऑस्ट्रेयाचा ल्यूक (67.07) कांस्य पदकाचा मानकरी ठरला.
हेही वाचा - Go For Gold! प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायकांनी दिल्या 'लवलिना बोर्गोहेन'ला अनोख्या शुभेच्छा
हेही वाचा - Tokyo olympic : अविश्वसणीय! सुवर्ण पदक जिंकण्यासाठी शार्लोट वर्थिंग्टनचा 360 डिग्री बॅकफ्लिप