टोकियो - भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. त्याने भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकलं. भारताचे टोकियो ऑलिम्पिकमधील हे पहिलं सुवर्ण पदक आहे. दरम्यान, पदक वितरण सोहळ्यात भारताचे राष्ट्रगीत सुरू झालं. तेव्हा नीरजच्या भावना दाटून आल्याचे पाहायला मिळाले.
पदक वितरण सोहळ्यात, विजेत्या खेळाडूंच्या देशाचे राष्ट्रगीत वाजवलं जातं. भारताच्या राष्ट्रगीताला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा नीरजचे डोळे पाणावलेले पाहायला मिळाले. दरम्यान, नीरज चोप्राचे हे पहिलंच ऑलिम्पिक आहे. त्याने आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकून दिलं.
-
Subedar #NeerajChopra brings home the gold in his #Olympics debut. The Indian national anthem plays in the stadium. How fortunate are we that we saw this live on TV. pic.twitter.com/XSal3JxNIJ
— Smita Prakash (@smitaprakash) August 7, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Subedar #NeerajChopra brings home the gold in his #Olympics debut. The Indian national anthem plays in the stadium. How fortunate are we that we saw this live on TV. pic.twitter.com/XSal3JxNIJ
— Smita Prakash (@smitaprakash) August 7, 2021Subedar #NeerajChopra brings home the gold in his #Olympics debut. The Indian national anthem plays in the stadium. How fortunate are we that we saw this live on TV. pic.twitter.com/XSal3JxNIJ
— Smita Prakash (@smitaprakash) August 7, 2021
नीरजने दिवंगत मिल्खा सिंगची अखेरची इच्छा पूर्ण केली
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने दिवंगत धावपटू मिल्खा सिंग यांची शेवटची इच्छा पूर्ण केली आहे. अॅथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडूने पदक जिंकावी, अशी इच्छा मिल्खा सिंग यांनी व्यक्त केली होती. त्याची ही इच्छा नीरज चोप्रा याने पूर्ण केली. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये थेट सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
जर्मन प्रशिक्षकाकडून घेतली ट्रेनिंग -
नीरज चोप्रा हा भालाफेकचा सराव जर्मन प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनात करत आहेत. जर्मनचे क्लाउस बार्तोनित्स हे त्याचे प्रशिक्षक आहेत. क्लाउस यांच्या मार्गदर्शनात नीरज चोप्राच्या कामगिरीत दिवसागणित सुधारणा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
वजन कमी करण्यासाठी आला आणि भालाफेकपटू बनला
नीरज चोप्रा हरियाणाचा पानीपत जिल्ह्याचा रहिवाशी आहे. त्याला आपलं वजन कमी करायचे होते. यामुळे तो अॅथलिटिक्समध्ये आला. त्यानंतर त्याने ग्रुप एज स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली. यात त्याने अनेक स्पर्धा जिंकल्या. यानंतर नीरजने भालाफेकमध्ये करियर केलं. 2016 मध्ये त्याने इंडियन आर्मी जॉईन केली.
हेही वाचा - Tokyo Olympics: नीरज चोप्राने सुवर्ण जिंकत दिवंगत मिल्खा सिंगची शेवटची इच्छा पूर्ण केली
हेही वाचा - Tokyo Olympics : शानदार, जबरदस्त, जिंदाबाद! नीरज चोप्राने इतिहास रचला, टोकियोत जिंकलं सुवर्ण पदक