सोलापूर - करमाळा तालुक्यातील मल्लखांब असोसिएशनने जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये रोप मल्लखांब या प्रकारात मुलींनी यश संपादन केले आहे.
हेही वाचा - इंग्लंडच्या फलंदाजांना घाबरवणारा आयर्लंडचा मुर्ताघ निवृत्त
14 वर्षाखालील वयोगटात सई शरद फंड, सानिका मनोज शहा, वैष्णवी कुमार पाटील, संयुक्ता संतोष सोनके व 17 वर्षाखालील गटात धनश्री शशिकांत पवार, तनिष्का नटराज फंड यांनी यश संपादन केले आहे. या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही निवड झाल्यामुळे खेळाडूंचा करमाळा येथे सन्मान करण्यात आला.
यावेळी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील बोलताना म्हणाले की, मल्लखांब खेळामध्ये मुलींनी मिळविलेले यश नक्कीच कौतुकास्पद असून क्रीडा क्षेत्रातील तालुक्यातील खेळाडूंना सहकार्य दिले जाईल. यावेळी अश्फाक सय्यद, सचिन जव्हेरी, नगरसेवक अतुल फंड, अरविंद फंड, शशिकांत पवार, कुमार पाटील, सुरेश कोळी, प्रविण दरेकर, अमोल रोकडे, विलास कलाल आदी मान्यवर उपस्थित होते.