मेलबर्न: टेनिसस्टार नोव्हाक जोकोविची (Tennis star Novak Djokovic) अपील न्यायालयाने फेटाळल्याने रविवारी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्याच्या (Dream of playing Australian Open shattered) त्याच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. फेडरल कोर्टाच्या तीन न्यायाधीशांनी 34 वर्षीय सर्बियनला जनहीताच्या आधारावर निकाल दिला. इमिग्रेशन मंत्र्यांनी शुक्रवारी खेळाडू नोव्हाक जोकोविचचा व्हिसा रद्द (Novak Djokovic's visa revoked) करण्याचा घेतलेला निर्णय कायम ठेवला आहे.
या निर्णयामागील कारण म्हणजे जोकोविचने कोविड-19 प्रतिंबंधक लसीकरण (Djokovic has not been vaccinated) केलेले नाही. या निर्णयानंतर, त्याला निर्वासित करण्यापूर्वी मेलबर्नमध्ये तो नजरकैदेत राहणार आहे. हद्दपारीच्या आदेशात सहसा त्याच्या ऑस्ट्रेलियाला परत येण्यावर तीन वर्षांची बंदीचा समावेश असतो. ऑस्ट्रेलियाचे ऑस्ट्रेलियातील जोकोविचची उपस्थिती ऑस्ट्रेलियन जनतेच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. तसेच इतरांना ऑस्ट्रेलियात लसीकरणाच्या विरोधात जाण्यास भाग पाडू शकते. या कारणास्तव इमिग्रेशन मंत्र्यांनी व्हिसा रद्द केला, त्यानंतर ६ जानेवारी रोजी मेलबर्न विमानतळावर जोकोविचचा व्हिसा रद्द करण्यात आला. तो 2022 च्या पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत भाग घेण्यासाठी आला होता.
हेही वाचा - Icc U19 Wc : अंडर १९ क्रिकेट विश्वचषक : भारताची विजयी सुरुवात, दक्षिण आफ्रिकेचा ४५ धावांनी पराभव