ETV Bharat / sports

आशियाई कुस्ती स्पर्धा : २७ वर्षांचा दुष्काळ संपला, सुनिलने जिंकलं सुवर्णपदक - Asian Wrestling Championships २०२०

आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सुनिलने ८७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत किर्गिस्तानच्या अझत साल्दिनोव्हचा ५-० ने पराभव करत सुवर्णपदक जिंकले.

Sunil Kumar ends India's 27-year wait for gold in Greco-Roman at Asian Wrestling Championships
आशियाई कुस्ती स्पर्धा : २७ वर्षांचा दुष्काळ संपला, सुनिलने जिंकलं सुवर्णपदक
author img

By

Published : Feb 19, 2020, 7:24 AM IST

नवी दिल्ली - आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सुनिल कुमारने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. त्याने भारताचा आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ग्रेको रोमन प्रकारात तब्बल २७ वर्षांचा दुष्काळ संपवला. सुनिलने ८७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत किर्गिस्तानच्या अझत साल्दिनोव्हचा ५-० ने पराभव करत सुवर्णपदक जिंकले.

Sunil Kumar ends India's 27-year wait for gold in Greco-Roman at Asian Wrestling Championships
सुनिल कुमार

अंतिम फेरीत सुनिलने एकतर्फा विजय मिळवला. त्याने किर्गिस्तानच्या अझतला गुण घ्यायची संधी दिली नाही. उपांत्य फेरीत सुनिलला कझाकिस्तानचा प्रतिस्पर्धी अझामत कुस्तुबायेव याचे कडवे आव्हान मिळाले. अझामत १-८ च्या फरकाने आघाडीवर होता. तेव्हा सुनिलने अखेरच्या क्षणात डाव पलटवत सलग ११ गुणांची कमाई केली आणि सामना १२-८ च्या फरकाने जिंकला.

हेही वाचा -

पुलवामा हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पाक संघ येणार भारतात, मोदी सरकारकडून व्हिसा मंजूर

हेही वाचा -

कोरोना इम्पॅक्ट : चीनच्या कुस्तीपटूंना भारत बंदी, आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतानं व्हिसा नाकारला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.