जळगाव - महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटना व जळगाव हौशी जिम्नॅस्टिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ३० व्या रिदमिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धेचा समारोप झाला. या स्पर्धेत ठाणे, मुंबई शहर व पुण्याच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवत विविध वयोगटात पदके पटकावली. स्पर्धेत यश मिळवणाऱ्या संघांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
ज्युनियर आणि सब ज्युनियर गटात ठाण्याच्या संघाने प्रथम तर मिनी गट १ आणि मिनी गट २ मध्ये मुंबई शहरच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. ज्युनियर (ऑल राऊण्डर) गटात देखील मुंबई शहरच्या संघाने वर्चस्व राखले.
रिदमिक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, आमदार लता सोनवणे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते डॉ. प्रदीप तळवेलकर, जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दिक्षित उपस्थित होते. या स्पर्धेत यश मिळवणाऱ्या खेळाडूंना आता आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळणार आहे.
हे आहेत विजेते संघ -
१) ज्युनियर गट
- प्रथम - ठाणे, द्वितीय - मुंबई शहर, तृतीय - पुणे.
२) सब ज्युनियर गट
- प्रथम - ठाणे, द्वितीय - मुंबई शहर, तृतीय - पुणे.
३) मिनी गट १
- प्रथम - मुंबई शहर, द्वितीय - पुणे, तृतीय - ठाणे.
४) मिनी गट २
- प्रथम - मुंबई शहर, द्वितीय - पुणे, तृतीय - ठाणे.
५) ज्युनियर (ऑल राउंडर)
- प्रथम - मुंबई शहर, द्वितीय - ठाणे, तृतीय - पालघर.
हेही वाचा - विहिरीत पडलेल्या बैलाला जेसीबीने काढले बाहेर; चाळीसगावातील घटना
हेही वाचा - जळगावामध्ये राज्यस्तरीय रिदमिक जिम्नॅस्टिक स्पर्धेला सुरुवात; राज्यभरातील 250 स्पर्धक सहभागी