ETV Bharat / sports

FIFA World Cup 2022: स्पेनची विश्वचषकात दमदार सुरवात, कोस्टारिका विरुद्ध 3-0 ने आघाडीवर - कोस्टारिका

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या दिवसाच्या तिसऱ्या सामन्यात स्पेन समोर कोस्टा रिकाचे आव्हान आहे. (SPAIN VS COSTA RICA)

SPAIN VS COSTA RICA
SPAIN VS COSTA RICA
author img

By

Published : Nov 23, 2022, 11:06 PM IST

दोहा - फुटबॉल विश्वचषक 2022 (FIFA WORLD CUP 2022) चौथ्या दिवसाच्या तिसऱ्या सामन्यात स्पेन समोर कोस्टा रिका चे आव्हान आहे. फिफा क्रमवारीत स्पेन सातव्या तर कोस्टा रिका 31व्या स्थानावर आहे. खेळाचा पूर्वार्ध संपला आहे. स्पेनचा संघ ३-० ने पुढे आहे.

स्पेनने तिसरा गोल पेनल्टीवर केला - दुआर्टेने कोस्टा रिकाच्या पेनल्टी बॉक्समध्ये स्पेनच्या जॉर्डी अल्बाला खाली पाडले. यामुळे रेफ्रींनी स्पेनला पेनल्टी दिली. फेरान टोरेसने पेनाल्टीमध्ये कुठलीही चूक न करता चेंडू थेट गोलपोस्टमध्ये टाकला.

स्पेनसाठी मार्को एसेंसिओने दुसरा गोल केला - स्पेनने २१व्या मिनिटाला आपली आघाडी दुप्पट केली. रियल माद्रिद कडून खेळणारा अनुभवी खेळाडू मार्को एसेन्सिओने संघाचा दुसरा गोल केला. बार्सिलोनाकडून खेळणाऱ्या जॉर्डी अल्बाच्या पासवर एसेन्सिओने गोल केला.

स्पेनच्या डॅनी ओल्मोने पहिला गोल केला - या सामन्यात स्पेनने पहिला गोल केला. डॅनी ओल्मोने 11व्या मिनिटाला कोस्टा रिकाचा दिग्गज गोलरक्षक कॅलोल नवास याला बीट करत शानदार गोल केला. युवा स्टार पेद्रीच्या पासवर त्याने चेंडू गोलपोस्टमध्ये टाकला.

मागील दोन विश्वचषकातील दोन सलामीच्या पराभवानंतर यावर्षी स्पेन आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच वेळी, कोस्टा रिका, 2018 च्या विश्वचषकातून गट टप्प्यात बाहेर पडल्यानंतर, कतारमध्ये प्रभावी कामगिरी करू इच्छित आहे. स्पेनने मागील पाच सामन्यांपैकी चार जिंकले आहेत आणि एक गमावला आहे. त्याचवेळी कोस्टा रिकाला पाचपैकी चार सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

दोन्ही संघांची स्टार्टींग इलेव्हन -

स्पेन - उनाई सिमोन (गोलकीपर), सेझर अझपिलिकुएटा, एमरिक लापोर्टे, रॉड्रि, जॉर्डी अल्बा, गेवी, सर्जियो बुस्केट्स, पेद्री, फेरान टोरेस, एसेंसिओ, डॅनी ओल्मो.

कोस्टा रिका - कॅलोर नव्हास (गोलकीपर), मार्टिनेझ, दुआर्टे, फुलर, कॅल्व्हो, ओव्हिएडो, तेजेडा, सेल्सो बोर्जेस, कॅम्पबेल, बेनेट, कॉन्ट्रेरास.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.