ETV Bharat / sports

Badminton Championships: ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात व्हिक्टर एक्सेलसेनकडून लक्ष्य सेन पराभूत - भारत बॅडमिंटन बातम्या

भारतीय स्टार लक्ष्य सेनने ( Indian star Lakshya Sen ) रविवारी ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या ( All England Badminton Championships ) अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या, टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या व्हिक्टर एक्सेलसेनकडून ( Victor Excelsen ) सरळ गेममध्ये पराभूत होऊन उपविजेतेपद पटकावले. त्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Lakshya Sen
Lakshya Sen
author img

By

Published : Mar 21, 2022, 12:17 PM IST

बर्मिंगहॅम: ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप ( All England Badminton Championships ) स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी पार पडला. हा सामना भारतीय स्टार लक्ष्य सेन ( Indian star Lakshya Sen ) विरुद्ध टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता व्हिक्टर एक्सेलसेन ( Olympic gold medalist Victor Excelsen ) यांच्यात झाला. या सामन्यात लक्ष्य सेनला विक्टर एक्सेलसेनने सरळ गेमध्ये पराभूत केले. विजेतेपदाच्या लढतीत त्याला डेन्मार्कच्या ऍक्सेलसेनकडून 10-21, 15-21 असा पराभव पत्करावा लागला. हा सामना 53 मिनिटे चालला. त्यामुळे लक्ष्य सेन हा उपविजेता ठरला. त्यानंतर लक्ष्य सेनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) आणि इतर मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

  • 🇮🇳's @lakshya_sen finishes as MS Runner-up at #AllEngland2022

    A commendable feat by the 20 yr, the youngest Indian to reach the FINAL after defeating WR-3 🇩🇰's Antonsen & WR-7 🇲🇾's Lee Zii Jia & giving us immense joy & memorable moments to reminiscent

    🇮🇳 is proud of you 🙂
    1/2 pic.twitter.com/pIxx0Yvbhe

    — SAI Media (@Media_SAI) March 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ऍक्सेलसेनने दाखवून दिले आहे की, तो मोठ्या सामन्यांचा तगडा खेळाडू आहे. पहिल्या गेममध्येच 5-0 अशी आघाडी घेत, त्याने लक्ष्यला दडपणाखाली आणले. यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये 61 शॉट्सची रॅली पाहायला मिळाली, ज्यामध्ये डॅनिश खेळाडूने बाजी ( Danish player's bet ) मारत 9-2 असा स्कोअर केला. यानंतर ब्रेकपर्यंत तो 11-2 ने पुढे होता. लक्ष्यने दोन-तीन प्रसंगी चांगले फटके मारले पण पहिल्या गेमवर पूर्णपणे एक्सलसेनचे वर्चस्व होते, जो त्याने 22 मिनिटांत सहज जिंकला.

  • Proud of you @lakshya_sen! You’ve shown remarkable grit and tenacity. You put up a spirited fight. Best wishes for your future endeavours. I am confident you will keep scaling new heights of success.

    — Narendra Modi (@narendramodi) March 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दुसऱ्या गेममध्येही एक्सेलसेनने 4-2 अशी आघाडी घेतली होती, पण लक्ष्यने लगेचच 4-4 अशी बरोबरी साधली. ऍक्सलसेनने सलग चार गुण मिळवत 8-4 अशी आघाडी घेतली आणि ब्रेकच्या वेळी तो 11-5 ने आघाडीवर होता. लक्ष्यने ब्रेकनंतर लागोपाठ तीन गुण मिळवले, पण ऍक्सेलसेनने त्याला परतण्याची संधी दिली नाही आणि लवकरच स्कोअर 17-10 असा कमी केला. यानंतर दोघांमध्ये 70 शॉट्सची रॅली पाहायला मिळाली ज्यामध्ये लक्ष्यने गुण मिळवले. ऍक्सेलसेनने स्मॅशसह सात मॅच पॉइंट्स मिळवले, त्यापैकी लक्ष्य केवळ दोन बचाव करू शकला. तत्पूर्वी, जपानच्या अकिनी यामागुचीने ( Akini Yamaguchi ) कोरियाच्या एन सेओंगचा 21-15, 21-15 असा पराभव करत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.